महाराष्ट्र युवक काँग्रेसमधील वाद चव्हाट्यावर ; आता ‘या’ पदाधिकाऱ्याने दिला राजीनामा!

Priya Pawar

पुणे : महाराष्ट्र युवक काँग्रेसमध्ये राजीनाम्याचं सत्र सुरूच असल्याचं चित्र आहे. आता युवक काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस प्रिया नारायण पवार यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. पवार यांच्या राजीनाम्यानंतर युवक काँग्रेसमधील वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.

प्रिया पवार यांनी राजीनाम्याचं पत्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांना पाठवलं आहे, तसेच त्यांनी आपल्या ट्विटर खात्यावरूनही हे पत्र सार्वजनिक केलं आहे.

शालेय जीवनापासूनच घरातील वातावरणामुळे तसेच सामाजिक सहभागामुळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसबद्दल माझ्या मनात ओढ निर्माण झाली होती. काँग्रेसने दिलेली जबाबदारी मी तळमळीने पार पाडण्याचा प्रयत्न केला; मात्र आरोग्यविषयक कारणांमुळे मी राजीनामा देत आहे, असं प्रिया पवार (Priya Pawar) यांनी पत्रात म्हटलं आहे. प्रिया पवार या पुण्याजवळच्या खेडचे माजी आमदार नारायण पवार यांच्या कन्या आहेत. त्यांना संघटनेतील गटबाजीचा फटका बसल्याची चर्चा आहे .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER