प्रिया बेर्डे राष्ट्रवादीमधून करणार राजकीय करिअरची सुरूवात

मराठी सिनेकलावंतांची ओढ राष्ट्रवादीकडे

Priya Berde

पुणे :- दिवंगत प्रसिद्ध अभिनेते लक्ष्मण बेर्डे यांच्या पत्नी व अभिनेत्री, प्रिया बेर्डे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करून राजकीय श्री गणेशा करणार आहेत. प्रिया बेर्डे या चित्रपट निर्मात्या, अभिनेत्री आणि दिग्दर्शक म्हणून मराठी इंडस्ट्रीत नावाजलेल्या आहेत. प्रिया लक्ष्मण बेर्डे या 7 जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत पुण्यात मार्केट यार्डातील ‘निसर्ग’ इथल्या पक्षाच्या कार्यालयात हा प्रवेश होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

प्रिया यांच्यासोबतच अभिनेते सिध्देश्वर झाडबुके, लावणीसमाज्ञी शकुंतलाताई नगरकर, अभिनेत्री सुहासिनी देशपांडे, अभिनेते विनोद खेडेकर, लेखक दिग्दर्शक डॉक्टर सुधीर निकम, निर्माते संतोष साखरे हेदेखील राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत.

सिनेसृष्टीमध्ये पडद्याच्या मागे काम करणाऱ्या आणि सिनेसृष्टीचा खरा आधार असणाऱ्या लोकांना मला मदत करायची आहे. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा चित्रपट व सांस्कृतिक विभाग उपयुक्त ठरू शकतो. यातून मी कलाकारांच्या अडचणी समजू शकते, त्यांना योग्य मदत करू शकते. त्यामुळे मी माझ्या कार्यकिर्दीचा हा नवीन टप्पा सुरू करत आहे अशी प्रतिक्रिया प्रिया बेर्डे यांनी एका वृत्तपत्राला दिली.

तसेच, पुणे हे माझ्यासाठी महत्त्वाचं शहर आहे. लक्ष्मीकांत बेर्डे फाऊंडेशनचं काम पुण्यात सुरू आहे. मुलांचं शिक्षणही पुण्यातच झालं आहे. त्यामुळे इथूनच मी माझ्या नव्या कामाला सुरुवात करणार आहे. यासाठी राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांची मला मदत असणार आहे असे प्रिया बेर्डे यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER