खाजगी दवाखान्यानी आयसीयू बेडची संख्या वाढवावी : मंत्री मुश्रीफ

Hassan Mushrif

मुंबई : कोल्हापूर (Kolhapur) शहरासह सबंध जिल्ह्यातील खाजगी दवाखान्यानी आयसीयू बेड व कोरोना (Corona) बेडची संख्या तात्काळ वाढवावी, असे आवाहन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hassan Mushrif) यांनी केले आहे. महापालिका आयुक्तांनीही आपत्कालीन परिस्थितीच्या कायद्याचा अभ्यास करून अश्या वाढीव सुविधा करण्याचे आदेश द्यावेत, अशा सूचनाही श्री मुश्रीफ यांनी केल्या आहेत.

मंत्री मुश्रीफ यांनी पुढे म्हटले आहे, कोल्हापूर जिल्ह्यातील रुग्णांकडे ज्यांच्या खिशाला परवडतील असे पैसे आहेत, ते खाजगी दवाखान्यात ऍडमिट होण्याचा आग्रह धरतात. तसेच ज्यांना लक्षणे नाहीत आणि सरकारी दवाखान्यामध्ये जाण्याची इच्छा नाही, असे लोकही खाजगी दवाखान्यांमध्ये जाण्याचा आग्रह धरतात. त्याशिवाय आपल्याला लागूनच जवळच असलेल्या कोकणामधून, सांगली व इतर जिल्ह्यातून तसेच जवळच असलेल्या कर्नाटकच्या भागांमधून येणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या वाढलेली आहे. त्यामुळे महानगरपालिकेने प्रत्येक दवाखान्यात अधिकाऱ्यांची नेमणूक करून सर्व लोकांना बेड उपलब्ध होतील, याबाबत दक्षता घेणे अत्यावश्यक आहे.

मुश्रीफ यांनी म्हटले आहे, ज्यांना लक्षणे नाहीत परंतु खिशात पैसे आहेत असे लोक खाजगी दवाखान्यामधून बेडची मागणी करतात व ही सुविधा वापरतात. त्यामुळे अत्यवस्थ झालेल्या व ज्यांना खरोखरच बेडची गरज आहे, अशा लोकांना उपचारांपासून वंचित रहावे लागते. खाजगी दवाखान्याना माझी विनंती आहे, कि अशा दवाखान्यांनी रुग्णांना हॉटेलची व्यवस्था करावी व त्यांना हॉटेलमध्येच उपचार द्यावेत. यातून अत्यावश्यक रुग्णांना बेड कसे मिळतील ? यासाठी महापालिका आयुक्तांनी सक्षम व गतिमान यंत्रणा तयार करावी.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER