बेवारस सापडलेली पर्स केली परत

खाजगी वाहनचालकाचा प्रामाणिकपणा, पोलिसांकडून कौतुक

Aurangabad news

औरंगाबाद : सिडको बसस्थानकावर एका खाजगी वाहन चालकाला एका महिलेची बेवारस पर्स सापडली. त्यात १६ हजार ७०० रूपये होते. चालकाने प्रामाणिकपणा दाखवत ही पर्स बसस्थानकामध्ये जमा केली. त्यानंतर संबधित महिलेला ती परत करण्यात आली.

ही बातमी पण वाचा : मुलाच्या मृत्यु प्रकरणी पित्याची न्यायालयात धाव

खाजगी वाहनावर चालक म्हणून काम करणारे सुधाकर उमाजी काळे(रा. भर जहागीर , जि. वाशिम) हे चारचाकी वाहन घेऊन सोमवारी (दि. १४) औरंगाबाद येथे आले होते. वेळ असल्यामुळे सायंकाळी पाच वाजता ते सिडको बसस्थानकावर गेले. यावेळी फलाट क्रमांक दोनवर एक पर्स त्यांनी सापडली. ही पर्स त्यांनी बसस्थानकाच्यास चौकशी कक्षातील कर्मचाऱ्याकडे जमा केली. कर्मचाऱ्याने पर्स उघडून पाहिली असता त्यात १६ हजार ७०० रूपये निघाले. तसेच महिलेचे आधार कार्ड व इतर कागदपत्रे आढळली. याचवेळी एक भांबावलेल्या अवस्थेतील महिला काही तरी शोधत असल्याचे काळे यांच्या लक्षात आले. त्यांनी महिलेला ताई काय शोधत आहात अशी विचारणा केली असता, माझी पर्स हरवली असल्याचे तिने सांगितले. काळे यांनी महिलेला बसस्थानकातील चौकशी कक्षामध्ये नेले. महिलेला पर्स संदर्भातील पुराव्यांची विचारणा केली असता तिने सांगितले मनिषा रमेश जायेभाये (रा. निमगाव गुरू ता. जि. बुलढाणा) या नावाचे आधार कार्ड पर्स मध्ये दिसून आले. ओळख पटताच महिलेला रक्कमेसह पर्स सुपूर्द करण्यात आली

यावेळी काळे यांचा प्रामाणिकपणा पहाता बसस्थानकातील कर्मचारी व पोलिसांनी त्यांचे कौतुक केले. काळे यांना पाचशे रूपये बक्षीस म्हणून देण्यात आले. तर मिनषा जायेभाये यांनी त्यांचे आभार मानले.