मनसेच्या इशाऱ्यानंतर खाजगी डॉक्टरांनी बिलाचे ३२ लाख रुपये केले परत

MNS.jpg

मुंबई : मनसेने (MNS) आंदोलनाचा इशारा देताच रुग्णांची आर्थिक लूट करणाऱ्या नवी मुंबईतील खाजगी हॉस्पिटलला (Pvt Hospitals) महापालिका आयुक्त अभिजित बांगर (Abhijit Bangar) यांनी चांगलाच दणका दिला आहे. मनसेच्या दणक्यानंतर नवी मुंबई शहरातील खाजगी हॉस्पिटल्सनी रुग्णांकडून कोरोना उपचाराच्या नावाखाली अधिकचे आकारलेले बिलाचे पैसे रुग्णांना परत देण्यास सुरुवात केली आहे.

नवी मुंबईतील रुग्णालयाने आकारलेले तब्बल ३२ लाख रुपये हॉस्पीटलने परत केले आहे. यामध्ये पी. के. सी. हॉस्पिटल (वाशी), एम. पी. सी. टी हॉस्पिटल (सानपाडा), एम. जी. एम. हॉस्पिटल (बेलापूर), फोर्टिस हॉस्पिटल (वाशी), डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल (नेरुळ), रिलायन्स हॉस्पिटल (कोपरखैरणे), अपोलो हॉस्पिटल (बेलापूर), ग्लोबल हॉस्पिटल (वाशी), राजपाल हॉस्पिटल (कोपरखैरणे), तेरणा हॉस्पिटल (नेरुळ) तसेच सनशाईन हॉस्पिटल (नेरुळ) या हॉस्पिटल्सनी रुग्णांकडून ज्यादा आकारलेले बिलाचे एकूण ३२ लाख रुपये आतापर्यंत परत केले आहेत.

कोरोनाच्या उपचाराच्या नावाखाली खाजगी डॉक्टरांकडून रुग्णांची होणारी लुटमार थांबविण्यासाठी मनसेने विशेष लेखा परीक्षण पथके तयार केली आहेत. ही पथके सात दिवसांत हॉस्पिटलच्या बिलांच्या तक्रारीबाबत पडताळणी करून अधिकचे आकारलेल्या बिलांचे पैसे परत करणे, दोषी हॉस्पिटलवर गुन्हा दाखल करणे अथवा हॉस्पिटलची मान्यता निलंबित करण्याबाबतची आवश्यक कायदेशीर कारवाई करण्यासाठी पुढे आले आहे- असे महापालिकेने मनसेला दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.

मनसेच्या निवेदनानंतर रुग्णांची आर्थिक लूट करणाऱ्या खाजगी हॉस्पिटलच्या विरोधात तक्रार करण्यासाठी 022-2756 73 89 हा हेल्पलाईन नंबर तसेच 720 849 0010 हा व्हॉट्सअ‍ॅप नंबर सुरू केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER