Privacy Policy

व्यक्तिगत खासगीपण जपण्याचे धोरण

महाराष्ट्र टुडे या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपले खासगीपण जपण्याच्या तुमच्या अधिकाराचा आम्ही आदर करतो. तुम्ही आमच्या संकेतस्थळाला भेट दिल्यानंतर तुमची इच्छा नसेल तर तुमची व्यक्तिगत माहिती आम्ही आमच्याकडे साठवून ठेवत नाही.

माहिती जमा करणे आणि स्वयंचलनाने साठवणे

जर तुम्ही आमच्या संकेतस्थळाला भेट दिलीत आणि पाने वाचलीत तर आम्ही तुमच्या भेटीबाबत काही विशिष्ट माहिती स्वयंचलित पद्धतीने साठवून ठेवतो. या माहितीवरून तुमची नेमकी ओळख पटू शकत नाही.
जी माहिती स्वयंचलित पद्धतीने जमा होते त्यामध्ये तुम्ही कोणते ब्राऊजर वापरता (उदा. नेटस्केप, इंटरनेट एक्सप्लोरर इ.), कोणती ऑपरेटिंग सिस्टम तुम्ही वापरता (उदा. विंडोज ९८ किंवा मॅक ओएस इ.) आणि तुम्हाला इंटरनेट सेवा पुरवणा-या कंपनीचे नाव (उदा. अमेरिका ऑनलाईन, सत्यम ऑनलाईन, मंत्रा ऑनलाईन, वीएसएनएल इ.), तारीख आणि तुम्ही भेट दिलेली वेळ आणि संकेतस्थळांवरील कोणकोणत्या पानांना तुम्ही भेट दिलीत याबाबत माहिती जमा करण्यात येते. काहीवेळेस आम्ही ही व्यक्तिगत नसलेली माहिती आमच्या संकेतस्थळाच्या डिझाईनमध्ये, मजकुरात सुधारणा करण्यासाठी आणि मुख्यत: वाचकांना उच्च प्रतीचा ब्राऊजिंग अनुभव देण्यासाठी वापरतो.

व्यक्तिगत माहिती जमा करणे

तुम्ही तुमची माहिती आपणहून देऊ केलीत तरच आम्ही ती आमच्याकडे जमा करतो. तुम्ही दिलेली माहिती कोणत्याही खासगी संस्था अथवा खासगी व्यक्तींना पुरवत नाही.