लोकशाही टिकवण्यासाठी आम्ही शिवसेनेसोबत हातमिळवणी केली : पृथ्वीराज चव्हाण

BJP - Mahavikas Aghadi

सातारा : लोकशाही टिकवण्यासाठी आम्ही शिवसेनेसोबत हातमिळवणी केली, असा खुलासा राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.

शिवसेना (Shiv Sena) या पक्षाविषयी निर्णय घेणे सर्वांसाठी थोडे अडचणीचे होते, परंतु भाजपातील (BJP) माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah), पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी काँग्रेस (Congress) पक्ष फोडून लोकशाही संपुष्टात आणण्याचे काम सुरु केले होते. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे चव्हाण म्हणाले .

सातारा येथील काँग्रेस कमिटीच्या कार्यालायात महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांच्या उपस्थितीत महाबळेश्वर तालुक्यातील कार्यकर्त्यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या भाषणात भाजपवर हल्लाबोल केला. भारतीय जनता पक्षाने काँग्रेसमधील अनेकांना कोंडीत पकडून, केसेसची भीती दाखवत पक्ष फोडला असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला. तर दुसरीकडे सांगली येथे झालेल्या ट्रॅक्टर रॅलीमध्ये देखील पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. केंद्र सरकारने या कायद्याबाबत चर्चा करायला पाहिजे होती पण नरेंद्र मोदी यांची काम करण्याची पध्दत ‘हम करे सो कायदा’ अशी आहे. निर्बुद्धपणे निर्णय घेतले जात आहेत. मोदींचा हट्टीपणा सुरू आहे. तोच हट्टीपणा शेतीच्या कायद्याबाबत मोदी सरकारने केला. हे कायदे शेतकरी हिताचे नाहीत तर उद्योगपतींच्या हिताचे आहेत, अशी टीकाही चव्हाण यांनी केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER