काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री म्हणतात – अधिवेशन, लग्न समारंभ होतात! एमपीएससी परीक्षा का नाही?

Prithviraj Chavan

पुणे : कोरोनाच्या साथीमुळे एमपीएससी (MPSC)च्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला. याला विध्यार्थी व विरोधी पक्षच नाही तर महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) काँग्रेसनेही विरोध केला आहे. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी ठाकरे सरकार (Thackeray Govt) सरकारला प्रश्न केला आहे – राज्यात अधिवेशन, लग्न समारंभ होतात! MPSC परीक्षा का नाही?

एका वृत्तवाहिनीशी बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, MPSC परीक्षेबाबत अनिश्चितता योग्य नाही, कोरोना काळात लग्न समारंभ, अधिवेशन पार पडतात मग फक्त विद्यार्थ्यांना शिक्षा देणे योग्य नाही. विद्यार्थींनी आणखी किती दिवस अभ्यास करायचा? ते भावी प्रशासकीय अधिकारी आहेत, कोरोना नियमांचे पालन करून परीक्षा घ्यायला हव्यात.

MPSC परीक्षा १४ मार्च रोजी होणार होत्या. राज्यात वाढलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे हजारो विद्यार्थी संतप्त झाले, त्यांनी पुण्यातील रस्त्यावर उतरून सरकारच्या निर्णयाचा विरोध केला, काँग्रेसचे नेते सत्यजित तांबे यांनीही या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही सरकारने या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी मागणी केली आहे.

याबाबत सत्यजित तांबे यांनी ट्विट केले – एमपीएससीची परीक्षा(MPSC Exam) अचानकपणे पुढे ढकलण्याचा जो निर्णय झाला आहे त्याचा मी जाहीर निषेध करतो. कोरोनाचे संकट कितीही मोठे असले तरीही अशा पद्धतीने अचानकपणे परीक्षा पुढे ढकलून काय साध्य होणार आहे? ह्या निर्णयावर तातडीने फेरविचार झालाच पाहिजे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER