फक्त लसी देण्यातच नाही तर वैद्यकीय उपकरणांतही केंद्र सरकारचा दुजाभाव; पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप

मुंबई :- महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा (Corona Virus) प्रादुर्भाव सातत्याने वाढतोय. अशा वेळी राज्यात कोरोना लसींचा तुटवडा भासत आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी सांगितले. त्यामुळे लसीकरण केंद्र बंद करण्याची नामुष्की ओढावली आहे.

दरम्यान, माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी केंद्र सरकावर आरोप केला आहे. फक्त लसीबाबतच नाही तर अन्य वैद्यकीय उपकरणांबाबतही महाराष्ट्रासोबत दुजाभाव झाल्याचा आरोप चव्हाण यांनी केला आहे.

“महाराष्ट्राला फक्त लसी देण्यातच नाही तर कोरोना काळात महत्त्वाची वैद्यकीय उपकरणे देण्यातसुद्धा केंद्र सरकारने दुजाभाव केला आहे. लोकसभेतील आकडेवारीनुसार गुजरात आणि उत्तरप्रदेश राज्यात रुग्णसंख्येच्या व्यस्त पटीने N95 मास्क, पीपीई किट्स आणि व्हेंटिलेटर्स केंद्र सरकारने दिले आहेत.” असे ट्विट पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे. सोबतच त्यांनी एक पत्रही जोडले आहे.

लोकसभेत केंद्राची माहिती

महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळत आहेत. लोकसभेत केंद्राने राज्यांना देण्यात आलेल्या वैद्यकीय उपकरणांची माहिती दिली. या माहितीनुसार विविध राज्यांमधील रुग्णसंख्या आणि त्यांना देण्यात आलेल्या उपकरणांची माहिती घेतली तर धक्कादायक चित्र निर्माण होत आहे, असे चव्हाण म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button