साताऱ्यातून उदयनराजे २ लाख मतांनी पराभूत होतील – पृथ्वीराज चव्हाण

Prithviraj Chavan-Udayanaraje Bhosale

सातारा :- साताऱ्याच्या पोटनिवडणुकीत उदयनराजे भोसले २ लाख मतांनी पराभूत होतील असे भाकीत माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी वर्तविले आहे. साताऱ्याच्या पोटनिवडणुकीसाठी मी उमेदवार असतो किंवा आता श्रीनिवास पाटील उमेदवार असले तरीही उदयनराजेंचा पराभव नक्कीच आहे.

ही बातमी पण वाचा : मागील ७० वर्षांमध्ये देशात काहीच झाले नाही; राहुल गांधींच्या भाषणाचा व्हिडिओ व्हायरल

कराडमध्ये रविवारी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपा नेते अमित शाह यांची प्रचार सभा पार पडली. या सभेनंतर चव्हाण यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. उदयनराजेंचा पराभव निश्चित आहे. खरंतरं मोदीच कराडला येणार होते, पण निकालाचा अंदाज आल्याने त्यांनी शाहंसारख्या दुय्यम फलंदाजाला इकडे पाठवले. कराड दक्षिण मतदारसंघातून काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण विरुद्ध भाजपाचे अतुल भोसले असा सामना होणार आहे. तर साताऱ्यातून उदयनराजे भाजपाकडून पोटनिवडणूक लढवत आहेत. त्यामुळे अतुल भोसले आणि उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ रविवारी कराडमध्ये अमित शाहांची सभा पार पडली.

दरम्यान पक्षश्रेष्ठींचा निर्णय म्हणून मी लोकसभा लढलो नाही, असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.