जाणून घ्या अश्विनला त्याच्या पत्नीने दिलाय कोणता ‘स्पेशल’ किताब?

Prithi calls Ash Anna as Master

भारताचा अष्टपैलू रविचंद्रन अश्विन याने इंग्लंडविरुध्दच्या दुसऱ्या कसोटीवर आपली अमीट छाप सोडली आहे. आपल्या घरच्या मैदानावर म्हणजे चेन्नईच्या एम.ए.चिदांबरम (चेपाॕक Chepauk) स्टेडियमवर पहिल्या डावात 5 बळी आणि नंतर शतकी खेळी करुन त्याने क्रिकेटप्रेमींची मने तर जिंकलीच आहेत पण अॕश अण्णासाठी ज्यांचा अभिप्राय सर्वात महत्त्वाचा आहे त्या आपल्या कुटूंबाचेही मन जिंकले आहे आणि त्याचे कुटूंब म्हणजे त्याची पत्नी प्रीतीनेही मजेशीर व रंगतदार व्टिटद्वारे हे प्रेम व्यक्त केले आहे.

प्रीतीने आपल्या नवऱ्याला चेपॉक मास्टरचा किताब दिला आहे आणि त्यासाठी अॕश अण्णाचा एक खास फोटोसुध्दा फोटोशॉप करून पोस्ट केला आहे.

त्यात तिने म्हटलेय की, Ash Anna in the Chepauk as MASTER.

अभिनेता विजय व दिग्दर्शक लोकेश कंगाराज यांचा अलीकडचा हिट सिनेमा ‘मास्टर’च्या पोस्टरवर तिने अश्विनचा फोटो झळकावला आहे आणि स्वतःच खोडकरपणे ‘आता हे कुणी केले?’ अशी ट्विटद्वारे चाहत्यांना विचारणासुध्दा केली आहे. हे व्टिट लगेच व्हायरल झाले असून त्यावर काॕमेंटसचा पाउस पडत आहे.

https://twitter.com/prithinarayanan/status/1361292550242500615?s=09

त्याच्याआधीसुध्दा अश्विनने शतक साजरे केल्यावर प्रीतीने ‘Husband is trolling everyone’ असे व्टिट करुन अश्विनच्या टीकाकारांची बोलती बंद केली होती.

https://twitter.com/prithinarayanan/status/1361216097383567362?s=19

प्रीतीप्रमाणेच भारताचा माजी कसोटीपटू, स्पष्टवक्ता गौतम गंभीर यानेसुध्दा अश्विनची मुक्तकंठाने प्रशंसा केली आहे. अश्विनने म्हटलेय की त्याच्या गुणवत्तेबद्दल प्रश्नच नव्हता. गुणवत्ता नसतांना कुणी पाच-पाच शतकं करूच शकत नाही. आणि ज्या शहरात तुम्ही लहानचे मोठे झालात, जिथे मोठमोठ्या खेळी करण्याची स्वप्ने तुम्ही नेहमीच पाहिलीत, ज्या खेळपट्टीवर फलंदाजी करणे अतिशय अवघड असल्याची चर्चा झाली आणि जिथे तुम्ही गोलंदाजीत पाच बळी मिळवले ते तर खासचअसणार ना!

दरम्यान, अश्विन व प्रीती यांची मुलगी आणि प्रीती दरम्यानचे एक गमतीशीर व्टिटही व्हायरल झाले आहे. त्यात त्यांची मुलगी प्रीतीला विचारतेय, “तू कशासाठी आनंदाने उड्या मारते आहेस माॕम?” यावर प्रीती त्या चिमुरडीला सांगते की विराटने ‘फिफ्टी’ केली ना…म्हणून! गंमत म्हणजे मुलीला वाटले ‘फिफ्टीन’ म्हणून ती निरागसपणे विचारते, की मग तो आता 16, 17, 18 केंव्हा करेल”?

https://twitter.com/prithinarayanan/status/1361214019860856833?s=19

मायलेकीतील या गमतीशीर संवादाचे व्टिटही चांगलेच व्हायरल झालेआहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER