प्रीतम शाह आत्महत्या : अर्णब गोस्वामीबाबतचे निकष लावून आरोपींना अटक करा – भातखळकर यांची मागणी

- चिठ्ठीत लिहली आहेत राष्ट्रवादीच्या नेत्यांची नाव

Atul Bhatkhalkar & Uddhav Thackeray

मुंबई : बारामती (Baramati) येथे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या शेजारी रहाणारे व्यापारी प्रीतम शाह (Pritam Shah) यांनी आत्महत्या केली. आत्महत्येआधी लिहिलेल्या चिठ्ठीत शाहा यांनी काही सावकार त्रास देत असल्याने आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे. आरोपित राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांची नाव आहेत. यावरून भाजपाचे (BJP) आ. अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या (CM Uddhav Thackeray) अकाऊंटला टॅग करून मागणी केली आहे – अर्णब गोस्वामीला (Arnab Goswami) अटक करण्यासाठी लावलेले निकष लावून या प्रकरणातील आरोपींना अटक करा.

या प्रकरणामध्ये राष्ट्रवादीच्या (NCP) नेत्यांवर कारवाई करणे ठाकरे सरकारला झेपेल का? असा टोमणाही भातखळकर यांनी ठाकरेंना मारला आहे.

प्रीतम शाह यांच्या मुलाने बारामती पोलिसांकडे ९ जणांविरोधात तक्रार केली आहे. यातील सहा जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली असून तीन जण फरार असल्याचे वृत्त एका वृत्तवाहिनीने दिले आहे. बारामतीचे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये काही सावकार आपल्याला त्रास देत असल्याचा उल्लेख शाह यांनी केला आहे. या लोकांच्या जाचाला कंटाळलो असून निराशेमुळे मी आत्महत्या करत आहे, असे म्हटले आहे.

शाह यांच्या मुलाने दाखल केलेल्या तक्रारीमध्ये नगरसेवक जयसिंह देखमुख, कुणाल काळे, संजय काटे, विकास धनके, प्रवणी गालिंदे, हनुमंत गवळी, सुनील अवाळे, संघर्ष गव्हाळे, मंगेश आमासे यांच्या नावांचा उल्लेख आहे. यापैकी एकजण बारामती बाजार समितीचा माजी अध्यक्ष आहे. आरोपींपैकी काहीजण नगरसेवक असून बारामती सहकारी बँकेच्या संचालकपदी असणाऱ्या व्यक्तीचाही आरोपींच्या यादीत समावेश आहे. सावकारी प्रकरणामधून व्यापाऱ्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली बारामती पोलिसांनी शहरातील राष्ट्रवादीचे काही नगरसेवक आणि शाह यांच्या मुलाने नाव घेतलेल्या लोकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे बारामतीत खळबळ उडली आहे.

अतुल भातखळकर यांचे ट्विट

या प्रकरणावर भातखळकर यांनी ट्विट करून प्रतिक्रिया दिली. “मुख्यमंत्री महोदय जो निकष लावून अर्णब गोस्वामी यांना अटक केली, तोच निकष लावून आता या राष्ट्रवादी काँग्रेसच्या धेंडांवर कारवाई करा…झेपेल काय?,” भातखळकर यांनी उद्धव ठाकरेंच्या अकाऊंटला टॅग केले आहे.

आरोपींनी प्रतीम शाह यांना ३० टक्के व्याजाने पैसे दिले होते. प्रीतम यांनी सर्व पैसे परत केल्यानंतरही आरोपी त्यांच्याकडून जास्त पैसे मागत होते, असा आरोप आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER