सुप्रिया सुळेंना प्रितम मुंडेंचं सडेतोड उत्तर

Supriya Sule - Pritam Munde

बीड : केंद्रातील सरकार असंवेदनशील आहे. गरीब शेतकऱ्यांचा हे सरकार सन्मान करत नाही. शेतकऱ्यांवर अन्यायच करत आहे. जे धोरण सरकारने आणलं आहे. त्यावर योग्य चर्चा करण्याची गरज आहे, असं सांगतानाच देशात अस्वस्थता वाढत आहे. शेतकरीही अस्वस्थ आहेत. त्यांना पैसे नको आहेत. त्यांना न्याय हवा आहे. सर्व काही पैशाने विकत घेता येत नाही. माणसाचा स्वाभिमान तर नाहीच नाही, अशी मागणी राष्ट्रवादीच्या (NCP) नेत्या तथा खा. सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केल्यानंतर खासदार प्रीतम मुंडे (Pritam Munde) यांनी सडेतोड उत्तर दिल आहे.

मोदी सरकारने (Modi Government) शेतकऱ्यांना न्याय तर दिलाच, मात्र त्याच बरोबर पैसा, त्यांच्या उत्पादनाला हमीभाव आणि शेतकऱ्यांची सुरक्षा देण्यात मोदी सरकार यशस्वी ठरले आहे, अशा शब्दात प्रीतम मुंडे यांनी सुप्रिया सुळे यांना टोला लगावला. भाजपचे आज राज्यभर शेतकरी संवाद अभियान सुरु आहे. बीडमधल्या संवाद अभियानामध्ये सहभागी झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रीतम मुंडे यांनी सुप्रिया सुळेंना टोला लगावला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER