प्रीतम मुंडेंची रक्षाबंधनाची ओवाळणीही पूरग्रस्तांंना भेट

Pritam Munde

परळी : पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यात आलेल्या महापूरात तेथील लोकांचा संसार उघड्यावर पडला आहे. पूरग्रस्तांना सावरण्यासाठी महाराष्ट्रभरातून मदतीचा ओघ सूरू आहे. भाजप सरकारने केंद्राकडेही मदत मागीतली आहे. तसेच राज्याच्या विविध भागातून पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत पैसे जमा होत आहेत.

परळी येथे 15 ऑगस्ट रोजी भाजप तर्फे खासदार डॉ. प्रितम मुंडे यांच्या पुढाकाराने मदत फेरी काढण्यात आली होती. या फेरीत 11 लाख 25हजार रुपयांची मदत जमा झाली. या सोबतच खासदार प्रीतम यांनी त्यांची रक्षाबंधनाची ओवाळणीही मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा केली.

शहरातील हमाल, मापाडी, रिक्षा चालक, व्यापारी, विक्रेते व वृद्धांनी पूरग्रस्तांसाठी मदत केली.

या फेरी दरम्यान, वैद्यनाथ बॅंकेच्य़ा कर्मचा-यांनी त्यांचा एक महिन्याचा पगार मदत म्हणून दिला. शहरातील भेल सेकंडरी इंग्लिश स्कुल, शहीद अब्दुल हमीद सेवाभावी संस्था या संस्थांनी चेक स्वरूपात मदत केली.

दुष्काळी जील्हा म्हणून बीडची ओळख असली आणि बीडकर दुष्काळाशी दोन होत करत जगत असले तरी त्यांच्या मनात स्नेह कायम आहे हे यातून दिसते असे प्रीतम मुंडे म्हणाल्य़ा.