विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार : वर्षा गायकवाड

Varsha Gaikwad

मुंबई : राज्यात कोरोना (Varsha Gaikwad) रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रोज हजारोंच्या संख्येने नव्या रुग्णांची नोंद होत आहे. वाढत्या रुग्ण संख्येमुळे उद्योगधंदे, व्यापार यांना आर्थिक फटका बसत आहे. तसेच भविष्यात होणाऱ्या राज्यातील वेगवेगळ्या परीक्षांवरसुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कोरोना संसर्ग वाढत असल्यामुळे परीक्षांचे आयोजन करणे, योग्य नसल्याच्या प्रतिक्रिया अनेक स्तरातून उमटत आहेत. याच पार्श्वभूमीवर दहावी-बारावीच्या परीक्षेसंदर्भात शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. काही दिवसांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याशी चर्चा करून दहावी-बारावीच्या परीक्षेसंदर्भात योग्य निर्णय घेऊ, असे वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी सांगितले.

“मागील काही दिवसांपासून आपण संवाद करत आहोत. सध्या कोरोना वाढल्यामुळे विद्यार्थी तणावात आहेत. या परिस्थितीत विद्यार्थ्यांनी परीक्षा कशी द्यावी, असा प्रश्न विद्यार्थ्यांना आहे. या प्रश्नावर शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून मागील काही दिवसांपासून विविध लोकांशी चर्चा करण्यात आली. यामध्ये शिक्षक, विद्यार्थी, लोकप्रतिनिधी यांच्याशी या काळात बोलणे झाले. मात्र, विद्यार्थ्यांचे आरोग्य हीच विद्यार्थ्यांची प्राथमिकता आहे. विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये या दृष्टीकोनातून आम्ही विचार करत आहोत. येणाऱ्या काही दिवसांत मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करणार आहे. त्यानंतर येणाऱ्या काही दिवसांत मी पुन्हा एकदा तुमच्याशी संवाद साधेल.” असे वर्षा गायकवाड म्हणाल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button