सडलेल्या पोषण आहाराच्या साठ्यावर छापा

Meal

रत्नागिरी/प्रतिनिधी :- खडपोली एमआयडीसीतील एका बंद कारखान्याच्या शेडमध्ये शालेय पोषण आहाराचा सडलेला साठा आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. खङपोली ग्रा. पं. व चिपळूण पं. स. च्या सभापती धनश्री शिंदे यांनी या गोडावूनवर धाड टाकून हा प्रकार उघड केला आहे. संपूर्ण जिल्हाभरातील शाळा तसेच अंगणवाड्यांना या पोषण आहाराचे धान्य वितरण केले जात असल्याची माहिती मिळाली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार एका बंद कारखान्याचे रूपांतर गोदामात करून त्यात १५ टन धान्य तर ७ टन डाळी असा सुमारे २२ टन धान्य साठा आहे. मात्र, यातील सुमारे ४० टक्के धान्य हे सडलेले व दुर्गंधी सुटलेले ग्रामस्थांनी पाहिले.

हा साठा माहेश्वरी बचतगट, बीड यांनी केलेला आहे. विशेष म्हणजे हा सडलेला साठा मोठ्या पंख्याने सुकवण्याचे काम सुरू होते. मात्र, येथील ग्रामस्थ मुराद अडरेकर व इतर यांनी हा प्रकार पाहिल्यानंतर त्यांनी पंचायत समिती सभापती धनश्री शिंदे, सरपंच रोशनी पवार, तलाठी नर्गिस ग्रामसेवक अधिकारी हंगे, रेश्मा पवार माजी सरपंच मुस्कान अडरेकर, संतोष कदम, प्रवीण पवार, सुरेंद्र कदम, धीरज खेडेकर तसेच संदीप चिपळूणकर यांना याची माहिती दिली. या सर्वांनी या गोडावूनची पाहणी केली. या गोदामातील डाळी काळ्या पडलेल्या असून तांदूळ खराब झाला आहे. मसाले हे बोगस असल्याचे निदर्शनास आले आहे.

छाप्यादरम्यान या गोडावूनच्या चारही बाजूने घाणीचे साम्राज्य परसल्याचे तसेच गटारांची दुर्गंधी पसरलेली आढळली. माशांमुळे गोडावूनला घाणीचे स्वरुप आलेले आहे. हे सडलेले आहे व त्याचे पॅकिग सुरु होते. हे पॅकिंग प्रकिया करुन जनावरांसाठी आम्ही खाद्य करणार असल्याचा दावा या बचत गटाच्या प्रमुखाने केला. मात्र, एकंदरित ग्रामस्थांनी या अगोदरच निकृष्ट आहाराबाबत आम्ही तक्रारी केलेल्या आहेत, असे सांगितले. या प्रकरणी मुलांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या बचत गटावर कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER