पंतप्रधान सुपारीबाज आंदोलकांना भीक घालणार नाहीत – भातखळकर

Atul Bhatkhalkar

मुंबई : कृषी कायद्यांना देशभरात विरोध केला जातोय. या कायद्यांविरोधात पंजाब, हरियाणा तसेच इतर राज्यांतील शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमा रोखून धरल्या आहेत. सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनीही या आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवलेला आहे. या पार्श्वभूमीवर “देशाच्या जनतेने नरेंद्र मोदींना पंतप्रधान बनवले आहे. ते तुमच्यासारख्या सुपारीबाज आंदोलकांना भीक घालणार नाहीत. ” असे ट्विट भाजप नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना उद्देशून केले.

मेधा पाटकर यांनीही कृषी कायद्यांना विरोध करत “कृषी कायद्यांवर चर्चा होऊच शकत नाही, तो मागेच घ्यावा लगेल. ” अशी मागणी केली आहे. मेधा पाटकर यांच्या याच भूमिकेवर भातखळकर यांनी ट्विटरद्वारे भाष्य केले.

दमबाजी कुणाला करताय? देशाच्या जनतेने घसघशीत मतदान करून नरेंद्र मोदींना पंतप्रधान (PM Narendra Modi) बनवले आहे. ते तुमच्यासारख्या भपकेबाज आंदोलकांना भीक घालणार नाहीत. तुमची दमबाजी मोडूनच काढायला हवी, असे अतुल भातखळकर म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER