जानेवारीपर्यंत कोरोना लस उपलब्ध होणार, पंतप्रधान मोदी सिरम इन्स्टिट्यूटला भेट देणार

Adar Poonawalla - PM Narendra Modi

पुणे : ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या (Oxford University) संशोधकांनी असा दावा केला आहे की कोरोना (Corona) रुग्णांवर कोविशील्‍ड लस अत्यंत प्रभावी आहे. त्यांचे म्हणणे आहे की कोविशील्‍ड कोरोनाविरूद्ध ७० टक्के प्रभावी आहे. आता सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या (Serum Institute Of India) अदार पूनावाला (Adar Poonawalla) यांनी या लसीवर प्रतिक्रिया दिली आहे.ऑक्सफर्ड-सिरम इन्स्टिट्यूटची लस डिसेंबरपर्यंत सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होणार असल्याचा दावा पुनावाला यांनी केला आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) १०० देशांच्या राजदूतांसह सिरम इन्स्टिट्यूटला भेट देणार आहेत.

१०० देशांच्या राजदूतांच्या दौऱ्याबाबत विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी एक बैठक घेत प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. १०० देशांचे राजदूत २७ नोव्हेंबरला पुण्यात दाखल होतील. त्याबाबत प्रशासनाला दौरा प्राप्त झाला आहे. तर २८ नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखल होणार असल्याची माहिती प्रशासकीयसूत्रांच्या हवाल्याने मिळाली आहे. दरम्यान पंतप्रधान मोदींचा दौरा अद्याप प्राप्त झाला नसल्याचं कळतंय. केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांमनी सौरभ राव यांची भेट घेत दौऱ्याचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या आहे. पंतप्रधान मोदी हे १०० देशांच्या राजदूतांसह सिरम इन्स्टिट्यूट निर्माण करत असलेल्या कोरोना लसीचा आढावा घेणार आहेत.

दरम्यान, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या अदार पूनावाला यांनी या लसीवर प्रतिक्रिया दिली आहे. पूनावाला यांनी, या लशीचे १० कोटी डोस जानेवारीपर्यंत उपलब्ध करुन देण्यात येतील असे सांगितले आहे. यासह फेब्रुवारीच्या अखेरीस आणखी लाखो डोस उपलब्ध करुन देण्याची योजना आहे.

अदार पूनावाला यांनी एनडीटीव्हीशी बोलताना, या लसीचा एक डोस जर फार्मसीमधून विकत घेतला तर त्याची किंमत १,००० रुपये असेल, मात्र सरकारला २५० रुपये प्रति डोस दराने लस दिली जाईल. पूनावाला यांच्या कंपनीने सरकारबरोबर लस मोठ्या प्रमाणात तयार करण्याचा करार केला आहे. त्यांचे म्हणणे आहे की लसीचे सुमारे ४ कोटी डोस आधीच तयार केले गेले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER