‘पंतप्रधान नरेंद्र मोदी, जागे व्हा!’ सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाला विरोधी पक्षांचा पुन्हा विरोध

Prime Minister Narendra Modi - Central Vista Project Again - Maharashtra Today

दिल्ली :- देशातील कोरोनाची गंभीर स्थिती लक्षात घेऊन राजधानी दिल्लीमध्ये सुरू असलेल्या सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाचे काम थांबवा, अशी मागणी विरोधी पक्षांनी पुन्हा केली आहे. केरळचे अर्थमंत्री थॉमस आयझॅक यांनी यासंदर्भात केलेल्या ट्विटमध्ये मोदींची तुलना हुकूमशाहशी केली आहे. थॉमस आयझॅक यांनी ट्विट केले – “पंतप्रधान नरेंद्र मोदींची सेंट्रल व्हिस्टासाठीची अतीव इच्छा ही अनेक राज्यकर्त्यांना किंवा हुकुमशाहांना मोठमोठ्या वास्तूंवर आपले नाव पुढच्या पिढ्यांसाठी कोरून ठेवण्यासाठी असलेल्या इच्छेसारखीच वाटते. जागे व्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), व्हिस्टासाठीचा पैसा लसीकरणासाठी वापरा!”

विरोधी पक्षांचे पत्र

काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी (Sonia Gandhi), राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी (Mamata Banerjee), तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि द्रमुकचे अध्यक्ष एम. के. स्टॅलिन अशा देशातल्या एकूण १२ पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी संयुक्तपणे थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं आहे. या पत्रामध्ये राजधानी दिल्लीमध्ये बांधला जाणारा सेंट्रल व्हिस्टा प्रकल्प, देशभरातल्या नागरिकांसाठीचं मोफत लसीकरण, केंद्र सरकारने पारित केलेले तीन  कृषी कायदे अशा एकूण नऊ  मुद्द्यांचा समावेश करण्यात आला आहे. दिल्लीतील सेंट्रल व्हिस्टा प्रकल्प तातडीने थांबवण्यात यावा आणि त्यासाठी देण्यात आलेला निधी ऑक्सिजन आणि लसींचा साठा मिळवण्यासाठी वापरावा, अशी मागणी केली आहे.

Disclaimer:-बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button