विरार रुग्णालयात अग्नितांडव ; पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मृतांच्या नातेवाईकांना २ लाखांची मदत जाहीर

Maharashtra Today

मुंबई :- विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला भीषण आग(Fire-at-virar-vijay-vallabh-hospital) लागल्याने 14 रुग्णांचा होरपळून मृत्यू (14 Die)झाला आहे. तर काही रुग्णांची प्रकृती गंभीर आहेत. या दुर्घटनेप्रकरणी नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. तसेच, रुग्णांच्या नातेवाईकांना मदत जाहीर केली आहे.

पंतप्रधान कार्यालयामार्फत ट्विट करण्यात आले आहे. यामध्ये रुग्णलयाला लागलेल्या आगीच्या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना २ लाखांची तर जखमींच्या नातेवाईकांना ५० हजारांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

दरम्यान दुसरीकडे, या आगीच्या दुर्घटनेप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनीही तीव्र दुःख व्यक्त केले असून उपचार घेत असलेल्या इतर रुग्णांना झळ पोहचू नये तसेच त्यांची लगेचच इतरत्र व्यवस्था करावी असे निर्देश दिले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button