पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला कोरोना लशीचा दुसरा डोस; नागरिकांनाही केले आवाहन

Maharashtra Today

मुंबई :- पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी आज (गुरूवार) दिल्लीतील एम्स रुग्णालयात जाऊन लसीचा दुसरा डोस घेतला. नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी लस घेतल्यानंतर नागरिकांनाही लसीकरण पूर्ण करण्याचं आवाहन केलं. “एम्स रुग्णालयात (AIIMs Hospital) आज करोना लसीचा दुसरा डोस (Second Dose Covid 19 Vaccine) घेतला. करोनाला हरवण्यासाठी उपलब्ध असलेल्या पर्यायांपैकी लसीकरण हा एक पर्याय आहे. जर तुम्ही करोना लसीसाठी पात्र असाल तर लवकरच लसीकरण पूर्ण करा. http://CoWin.gov.in वर रजिस्टर करा, असे मोदी यावेळी म्हणाले. यापूर्वी त्यांनी १ मार्च रोजी लसीचा पहिला डोस घेतला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button