पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आर. माधवनच्या रॉकेट्री सिनेमाची प्रशंसा

Rocketary - PM Modi - R Madhvan - Maharastra Today
Rocketary - PM Modi - R Madhvan - Maharastra Today

साऊथ आणि बॉलिवूडमधील (Bollywood) प्रख्यात अभिनेता आर. माधवन (R Madhavan) आता दिग्दर्शकही झाला असून त्याने त्याचा पहिलाच सिनेमा एका सत्य कथेवर तयार केला आहे. काही दिवसांपूर्वी त्याने त्याच्या या सिनेमाचा टीझर सोशल मीडियावर पोस्ट केला होता. या टीझरला बॉलिवूडमधील अमिताभ बच्चनपासून कंगना, प्रियांका चोप्रापर्यंत अनेक कलाकारांनी लाईक करून माधवनची प्रशंसा केली होती. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनीही माधवनच्या या सिनेमाचा टीझर पाहून त्याची प्रशंसा केली आहे. स्वतः माधवननेच सोमवारी सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच्या भेटीचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करून ही माहिती दिली.

आर. माधवन प्रथमच दिग्दर्शन करीत असलेल्या या सिनेमाचे नाव ‘रॉकेट्री : द नंबी इफेक्ट’ (Rocketry- The Nambi Effect) असे असून यात त्यानेच मुख्य भूमिकाही साकारली आहे. हा सिनेमा प्रख्यात वैज्ञानिक एस. नंबी नारायण यांच्या जीवनावर आधारित आहे. काही दिवसांपूर्वी आर माधवन आणि प्रख्यात वैज्ञानिक एस नंबी नारायणन (S. Narayan Nambi) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. या भेटीत त्यांनी ‘रॉकेट्री : द नंबी इफेक्ट’ सिनेमाबाबत पंतप्रधानांना माहिती दिली होती आणि सिनेमाच्या काही क्लिप्सही दाखवल्या होत्या. सोमवारी दुपारी आर. माधवनने पंतप्रधानांसोबतच्या भेटीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करीत लिहिले, काही आठवड्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आम्ही भेट घेतली होती. या भेटीत आम्ही आमच्या नव्या ‘रॉकेट्री : द नंबी इफेक्ट’ सिनेमाबाबत चर्चा केली होती. पंतप्रधानांनी क्लिप्स पाहून प्रशंसा केली आणि नंबी यांच्याबाबत झालेल्या चुकांबाबतही चर्चा केली. आम्हाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.

आर. माधवनच्या या ट्विटनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याला उत्तर देत म्हटले, ‘तुमच्याशी (आर माधवन) आणि प्रतिभाशाली एस नंबी नारायणन यांना भेटून खूप आनंद झाला. हा सिनेमा एका महत्वाच्या विषयाला हात घालणारा आहे. या सिनेमाबाबत जास्तीत जास्त लोकांना माहिती झाली पाहिजे. आपल्या वैज्ञानिकांनी आणि तंत्रज्ञांनी देशासाठी बलिदान केलेले आहे आणि याची झलक रॉकेट्रीच्या क्लिपमध्ये पाहायला मिळते.’ पंतप्रधानांच्या या ट्विटला उत्तर देताना आर माधवन ने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.

‘रॉकेट्री : द नंबी इफेक्ट’ हा सिनेमा देशाची गुपिते दुसऱ्या देशांना विकल्याच्या आरोपाखाली तुरुंगात गेलेल्या एयरोस्पेस इंजीनियर एस नंबी नारायणन यांच्या जीवनावर आधारित आहे. 1996 मध्ये सीबीआयने त्यांना सर्व आरोपातून मुक्त केले होते आणि १९९८ मध्ये सर्वोच्च न्यायालयानेही नम्बी नारायणन यांना ‘नॉट गिल्टी’ घोषित केले होते. त्यानंतर दोन वर्षांपूर्वी म्हणजे २०१९ मध्ये त्यांना पद्म भूषण पुरस्कारानेही सम्मानित करण्यात आले होते. आर. माधवनचा हा सिनेमा तामिळ, तेलुगु, हिदी, कन्नड आणि इंग्रजी या पाच भाषांमध्ये रिलीज केला जाणार आहे.

ही बातमी पण वाचा : अमिताभ-दीपिकाच्या ‘द इंटर्न’चा फर्स्ट लुक झाला रिलीज

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button