पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली शरद पवारांच्या प्रकृतीची चौकशी

CM Uddhav Thackeray - PM Narendra Modi - Sharad Pawar

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी शिष्टमंडळासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची दिल्लीत भेट घेतली. या भेटीत विविध विषयांवर चर्चा झाली. या भेटीत मोदींनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्या प्रकृतीची चौकशी केली.

या संदर्भात उल्लेखनीय आहे की, काही दिवसापूर्वी शरद पवार यांच्यावर छोटी शस्त्रक्रिया झाली होती. त्यासंदर्भात मोदी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे शरद पवार यांच्या तब्येतीची विचारपूस केली.

पंतप्रधानांसोबत झालेल्या भेटीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी पत्रकार परिषद घेत भेटीत चर्चेबाबत माहिती दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button