अटल बोगद्याचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन

 लष्कराला सहज पोचता येणार चीन-पाकिस्तान सीमेवर

prime-minister-narendra-modi-inaugurates-atal-tunnel-at-rohtang

मुंबई: प्रदेशमध्ये मनाली-लेह मार्गावर ( Manali-Leh route) उभारण्यात आलेला ९.०२ किमी लांबीच्या ‘अटल टनल रोहतांग’ (Atal Tunnel Rohtang)या बोगद्याचे आज (शनिवार) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले . हा जगातील सर्वात मोठा बोगदा असून भारतीय लष्कराला त्यामुळे पाकिस्तान आणि चीन सीमेपर्यंत सहज प्रवेश करता येणार आहे. बोगद्याच्या उद्घाटनप्रसंगी मोदींसह संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (rajnath Singh), वित्त राज्यमंत्री अनुराग ठाकूर, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूरदेखील यावेळी उपस्थित होते.

Atal Tunnel: PM Modi to inaugurate world's longest high-altitude tunnel  tomorrow. Take a lookहिमालयाच्या दुर्गम पर्वरांगांमधील डोंगर खोदून हा बोगदा तयार करण्यात आला आहे. हा बोगदा 3,060 मीटर उंचीवर आहे. रोहतांग पासद्वारे मनालीहून लेहला जाण्यासाठी 474 किलोमीटरचे अंतर कापावे लागत होते. अटल बोगद्यामुळे हे अंतर 428 किलोमीटर इतके झाले आहे. हा बोगदा बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनने (BRO) तयार केला आहे.

दरम्यान, बोगद्याच्या उद्घाटनापूर्वी पंतप्रधान मोदींनी ट्विटरद्वारे याची माहिती दिली. तसेच मोदींनी यात म्हटले आहे की, हा बोगदा या परिसरातील कनेक्टिव्हिटीचा प्रश्न सोडवणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER