पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोंगेवाला चौकीत सैनिकांसोबत साजरी केली दिवाळी

PM Modi

जैसलमेर : सैनिक आहेत म्हणून आज आपण देशात सण साजरे करू शकतो, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi)यांनी जवानांचा गौरव केला. राजस्थानच्या जैसलमेरमध्ये लोंगेवाला चौकीत पंतप्रधानांनी सीमा सुरक्षा दल आणि लष्कराच्या जवानांसोबत त्यांनी दिवाळी साजरी केली.

जवानांना संबोधित करताना मोदी म्हणालेत – मी देशवासीयांचे प्रेम आणि आपुलकी घेऊन तुमच्याकडे आलो आहे. पंतप्रधानांसोबत चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत, लष्कर प्रमुख नरवणे, हवाईदल प्रमुख चीफ मार्शल आरकेएस भदौरिया आणि बीएसएफचे डीजी राकेश अस्थाना (Rakesh Asthana)हजर होते.

जवान असतील तर सण आणि उत्सव आहेत. जवानांशिवाय माझे दिवाळी साजरी करण अपूर्ण आहे, असं मोदी म्हणाले. मोदी यांनी यांवेळी १९७१ मध्ये पाकिस्तानसोबत लोंगेवाला येथे झालेल्या ऐतिहासिक युद्धाचीही आठवण काढली. भारताच्या जवानांनी इतिहास लिहिला आहे. भारतीय सैन्यासमोर कोणतीही ताकद टिकाव धरू शकणार नाही हे या युद्धानं दाखवून दिल आहे, असे ते म्हणाले.

लोंगेवाला येथील युद्धाला ५० वर्ष पूर्ण होणार आहेत. संपूर्ण देश शूरवीरांच्या गाथा ऐकून अभिमान व्यक्त करेल. आपल्या शूरवीरांचा भारतमातेलाही अभिमान आहे, असे म्हणत मोदींनी देशसेवेत असलेल्या जवानांना नमन केले.

भारत समजून घेणं आणि समजावण्यावर विश्वास ठेवतो. भारताची रणनीती एकदम स्पष्ट आहे. परंतु आम्हाला आजमावण्याचा प्रयत्न केला तर त्यांना त्याचे उत्तरही योग्य मिळते, अस मोदी म्हणाले. पंतप्रधानांनी देशाच्या सैन्यासाठी उत्पादन करण्यास पुढे येण्याचं आवाहन केल. संरक्षण क्षेत्र आत्मनिर्भर करण्याची प्रक्रिया जलद करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER