पंतप्रधान नरेंद्र मोदी ठरले विश्वसनीय विश्वलिडर – रामदास आठवले

PM Narendra Modi - Ramdas Athawale

मुंबई :- कोरोनाच्या (Corona) पार्श्वभूमीवर जगात सर्वोत्कृष्ट कार्य करणारे नेते म्हणून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे जगातील सर्व नेत्यांमध्ये सर्वोत्तम लोकप्रिय क्रमांक एकचे नेते ठरले आहेत.

अमेरिकेच्या मॉर्निंग कन्सल्ट या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात जगभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रथम क्रमांकाचे नेते ठरले आहेत. त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मनःपूर्वक अभिनंदन करीत असल्याचे रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे .

सर्व भारतीय जनतेचा अतूट विश्वास जिंकणारे पंतप्रधान नरेंद्र मोदिंनी जगभरातील लोकशाही प्रेमींचा विश्वास जिंकला असून ते विश्वसनीय विश्वलिडर बनले आहेत. त्यांच्या दृष्ट्या महान नेतृत्वाचा आम्हाला अभिमान असल्याचे ही आठवले म्हणाले .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER