पंतप्रधान मोदींचा पश्चिम बंगाल दौरा रद्द, उद्या घेणार उच्चस्तरीय बैठका

Narendra Modi

नवी दिल्ली : देशात वाढत असलेला कोरोनाचा उद्रेक पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्याचा पश्चिम बंगालचा दौरा रद्द केला आहे. देशातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी उद्या उच्चस्तरीय बैठका बोलावल्या आहेत. उद्याचा पश्चिम बंगाल दौरा रद्द केल्याचं त्यांनी ट्विटद्वारे सांगितले आहे. तर काँग्रेसकडून नरेंद्र मोदींना राहुल गांधीच्या पश्चिम बंगालमध्ये सभा न घेण्याचं जाहीर केलं होतं. त्या पावलावर पाऊल टाकल्याबद्दल धन्यवाद, अशी प्रतिक्रिया काँग्रेसने दिली आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार कोरोनासंदर्भात देशातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सकाळी ९ वाजता उच्चस्तरीय बैठक आयोजित केली आहे. त्यानंतर सकाळी १० वाजता सर्व राज्यांवर कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे आलेल्या तणावासंदर्भात सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी बैठक आयोजित करण्यात आली आहे. नरेंद्र मोदी दुपारी १२.३० वाजता देशातील आघाडीच्या ऑक्सिजन निर्मिती कंपन्यांच्या अधिकाऱ्यांसोबत आणि मालकांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ऑक्सिजनच्या स्थितीबद्दल उच्चस्तरीय आढावा बैठक घेतली. वैद्यकीय क्षेत्रासाठी ऑक्सिजन कशा प्रकारे वाढवण्यात येईल यासोबत ऑक्सिजन कसा वाढवावा, याविषयी त्यांनी चर्चा केली. तर, जे साठेबाजी करतील त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशा सूचना नरेंद्र मोदी यांनी दिल्या.

दरम्यान, महाराष्ट्रातील काँग्रेसच्या प्रमुख नेत्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या पावलावर पाऊल ठेवल्याबद्दल आभार मानले. राहुल गांधी यांनी पश्चिम बंगालमधील सभा रद्द केल्या होत्या. राहुल गांधीच्या पावलावर पाऊल टाकत नरेंद्र मोदी यांनी त्यांचा प्राधान्यक्रम बदलला याविषयी धन्यवाद, असं ट्विट यशोमती ठाकूर यांनी केलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button