गोपिनाथांसाठी वाजपेयींनी घेतलेल्या जागेवरच पंतप्रधान मोदीची 17 रोजी परळी येथे जाहिर सभा

वैद्यनाथ कॉलेजसमोरील मैदानात होणार सभा

pm modi

परळी वैजनाथ/ प्रतिनिधी: विधानसभा निवडणुक अवघ्या 7 दिवसांवर येऊन ठेपली आहे. प्रचार सभांचा जोरही आता वाढत आहे. परळी मतदार संघाच्या महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्या प्रचारार्थ गुरुवार दि.17 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आयोजित करण्यात आली आहे.या सभेचे ठिकाण आता ठरले असून वैद्यनाथ कॉलेज समोरील मैदानात ही सभा होणार आहे.वाजपेयी यांनीही याच मैदानात सभा घेतली होती.या सभेसाठी पोलीस प्रशासनाकडून गोपीनाथ गड आणि वैद्यनाथ मंदिर या दोन जागेची पाहणी करण्यात आली होती.

1999 साली लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या प्रचारासाठी अटलबिहारी वाजपेयी यांनी घेतलेल्या सभेच्या ठिकाणीच मोदींची सभा होणार आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी वैद्यनाथ कॉलेज समोरील मैदानात तयारी आता सुरू झाली आहे.आयोजकांनीही याच मैदानाला प्राधान्य दिले होते.अंदाजे 25 एक्कर च्या या मैदानात 3 हेलिकॉप्टर साठी हेलिपॅड, भव्य मंच अशी व्यवस्था करण्यात येणार आहे.या सभेसाठी राज्याच्याच नाही तर देशाच्या विविध भागांतील नेते,नागरिक लाखोंच्या संख्येने येणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे. संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रवींद्र सिंघल यांनी वैद्यनाथ कॉलेज समोर असलेल्या मैदानाची गुरुवारी पाहणी केली होती, यावेळी बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक हर्ष पोदार हे उपस्थित होते.