पंतप्रधान मोदी यांनी सुपरस्टार रजनीकांत यांना ७० व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या

PM Modi-Rajnikant

सुपरस्टार रजनीकांत (Rajnikant) आज १२ डिसेंबरला ७० वर्षांचे झाले. या निमित्ताने जगभरातील त्यांचे चाहते त्यांना केवळ शुभेच्छाच देत नाहीत तर बऱ्याच ठिकाणी खास कार्यक्रम साजरा करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही रजनीकांत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधान मोदींनी (PM Modi) ट्विट करून लिहिले- ‘प्रिय रजनीकांतजी, तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुमचे आयुष्य दीर्घायुषी व निरोगी राहो.’

रजनीकांत यांनी नुकतेच तामिळनाडू विधानसभा निवडणूक २०२१ मध्ये सर्व जागा लढवण्याची घोषणा केली. या महिन्याच्या अखेरीस रजनीकांत वेगळ्या राजकीय पक्षाची घोषणा करू शकतात. तमिळनाडूमध्ये एप्रिल ते मे २०२१ मध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत.

रजनीकांत यांचा जन्म १२ डिसेंबर १९५० रोजी बंगळुरू येथे झाला होता. त्यांना लोक इतके चाहतात की, चाहते त्यांना ‘देव’ मानतात. रजनीकांत यांचे चित्रपट पहाटे साडेतीन वाजेपर्यंत प्रदर्शित होतात. तथापि, लहानपणी त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. यामुळे ते कुली म्हणून काम करायचे. नंतर त्यांनी काही काळ बस कंडक्टर म्हणूनही काम केले. रजनीकांत यांना नेहमीच चित्रपटांमध्ये रुची राहिली आहे.

यात त्यांना त्यांचा एक मित्र राजबहादूरने मदत केली आणि मद्रास फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेण्यास सांगितले. रजनीकांत यांनी आपल्या कारकीर्दीची सुरुवात १९७५ मध्ये रिलीज झालेल्या ‘अपूर्वा रागनगाल’ या चित्रपटाने केली होती. त्यांच्याशिवाय कमल हसन आणि श्रीविद्यासारख्या मोठ्या स्टार्सनीही या चित्रपटात काम केले होते. कारकीर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी बर्‍याच नकारात्मक भूमिका केल्या. पहिल्यांदाच ‘भुवन ओरु केल्विकुरी’ चित्रपटात रजनीकांत यांनी नायकाची भूमिका केली होती. १९८३ मध्ये त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यांचा पहिला हिंदी चित्रपट ‘अंधा कानून’ होता. आज रजनीकांत यांना दक्षिण भारतीय सिनेमाचा सर्वांत मोठा स्टार म्हटले जाते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER