पंतप्रधान मोदींनी एम्समध्ये घेतली कोरोना लस

PM Narendra Modi - Coronavirus Vaccine

नवी दिल्ली :- पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी कोरोनाची लस घेतली. नवी दिल्लीतील (New Delhi) एम्स (AIIMS) रुग्णालयात लस देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे. दिल्लीच्या एम्स रुग्णालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोरोना लसीचा (Coronavirus Vaccine) पहिला डोस देण्यात आला. मी एम्समध्ये जाऊन कोव्हिड लसीचा पहिला डोस घेतला. कोरोनाविरुद्धच्या लढाईत आपल्या देशाचे वैज्ञानिक आणि डॉक्टर्स ज्या वेगाने काम करत आहेत, ते प्रशंसनीय आहे. कोरोना लस घेण्यासाठी पात्र असलेल्या व्यक्तींना मी लसीकरणासाठी येण्याचे आवाहन करतो. आपण सर्वांनी एकत्र मिळून देशाला कोरोनामुक्त करुयात, असे नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत म्हटले आहे.

दिल्लीतील एम्स रुग्णालयात पंतप्रधान मोदी यांनी भारत बायोटेक लसीचा पहिला डोस सकाळी 6 वाजून 25 मिनिटांनी घेतला.अंतिम टप्प्याच्या चाचण्या होण्यापूर्वीच या लसीला मान्यता मिळाल्याने कोव्हॅक्सीनच्या सुरक्षिततेतविषयी अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात अनेक आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोव्हॅक्सीन ही देशी लस घेण्यास नकार दिला होता. त्यामुळे मोठा पेच निर्माण झाला होता. मात्र, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: कोव्हॅक्सीन टोचून घेतल्याने या लसीविषयीची शंका दूर होण्याची शक्यता आहे. परिणामी लसीकरण मोहिमेचा वेगही वाढण्याचा अंदाज आहे.

आजपासून कोरोना लसीकरण मोहिमेचा तिसरा टप्पा सुरू झाला आहे. या टप्प्यात 60 वर्षापुढील व्यक्तींना लस देण्यात येणार आहे आणि 45 वर्षापुढील नागरिकांना लस देण्यात येणार आहे. याशिवाय, खासगी रुग्णालयातही 250 रुपयांत कोरोना लस देण्यात येणार आहे. केंद्र सरकारने नुकतीच यासाठी परवानगी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER