पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानचे काढले वाभाडे, चीनला दिली समज

- 'ब्रिक्स' संमेलनात पुतिन यांचा भारताला पाठिंबा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी ब्रिक्स (BRICS) (ब्राझिल, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण अफ्रीका) संमेलनात पाकिस्तानवर जोरदार हल्ला केला. दहशतवाद ही जगासमोरची सगळ्यात मोठी समस्या आहे. काही देश दहशतवाद्यांना मदत करत त्यांना पोसतात; त्या देशांवर बहिष्कार टाका, ते आवाहन त्यानी पाकिस्तानचे नाव न घेता केले.

संयुक्त राष्ट्र (UN) आयएमएफ (IMF), जागतिक व्यापार संघटना या जागतिक संघटनांमध्ये मुलभूत सुधारणा करण्याची गरज मोदींनी व्यक्त केली. मोदी यांच्या मतांना रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांनी पाठिंबा व्यक्त केला.
आर्थिक मुद्यांवरून जगाची कोंडी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या चीनलाही त्यांनी सुनावले. आत्मनिर्भर भारताच्या घोषणेमुळे इतरांनी घाबरण्याचं कारण नाही. आमच्या प्रगतीमुळे सर्व जगाचे कल्याण होणार आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली.

या संमेलनात रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांच्यासह चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग हेही सहभागी झाले आहेत. चीनसोबतच्या सीमा वादानंतर पहिल्यांदाच जिनपिंग आणि मोदी एकाच संमेलनात सहभागी झाले आहेत. त्यामुळे मोदी काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं.

यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी यांनी आत्मनिर्भर भारताचा उल्लेख केला. कोविड नंतरच्या जागतिक अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी भारताने मोठ्या प्रमाणावर आर्थिक सुधारणा केल्या आहेत. पायाभूत सुविधांमध्ये वाढ केली आहे. त्यामुळेच भारत २०० देशांना औषधांचा पुरवढा करू शकला असे मोदी म्हणालेत. कोविड लसीचे संशोधन आणि उत्पादनातही भारत जगातल्या अनेक देशांना मदत करेल अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER