पंतप्रधान मोदींनी केले महाराष्ट्राच्या कोरोना लढ्याचे कौतुक; उद्धव ठाकरेंना म्हणाले…

Uddhav Thackeray - PM Modi - Maharshtra Today

मुंबई : राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार कोरोनावर (Corona) मात करण्यासाठी प्रयत्नशील आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी ‘कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी महाराष्ट्र चांगली लढाई लढत आहे’ अशा शब्दांत कौतुक केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाविरुद्ध लढाईत महाराष्ट्र करीत असलेल्या सामन्यासंदर्भात आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडून दूरध्वनीद्वारे माहिती घेतली तसेच दुसऱ्या लाटेशी मुकाबला करताना महाराष्ट्र चांगली लढाई लढतो आहे, असे सांगितले .

पंतप्रधान आणि केंद्र सरकार हे कोरोना लढ्यात महाराष्ट्राला प्रथमपासून मार्गदर्शन करीत असून त्याचा चांगला उपयोग राज्य सरकारला होतो आहे. महाराष्ट्राच्या काही सूचना केंद्राने मान्यही केल्या याविषयीही मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांचे आभार मानले. तसंच, राज्यातील लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी तत्काळ लसींचा पुरवठा करण्याची मागणीही मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदींकडे केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button