नोबेल पुरस्कारासाठी पंतप्रधान मोदींच्या नावाची शिफारस!

prime minister modi

बंगळुरु : शांततेसाठी दिल्या जाणाऱ्या नोबेल पुरस्कारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. तामिळनाडू भाजपाच्या प्रदेशाध्यक्षा डॉ. तमिलीसाई सुंदरराजन यांनी मोदींच्या नावाची शिफारस या पुरस्कारासाठी केली आहे. मोदींनी आयुष्यमान भारत योजनेची सुरुवात केली. ही जगातील सर्वात मोठी आरोग्य योजना आहे. त्यामुळे मोदींना नोबेल पुरस्कार दिला जावा, असं सुंदरराजन यांनी नमूद केलं आहे.

ही बातमी पण वाचा : मोदींना हरवण्यासाठी पाकिस्तानची काँग्रेसला साथ : भाजपचा आरोप

डॉ. तमिलीसाई सुंदरराजन यांच्या वतीनं त्यांच्या पतीनं मोदींना नोबेल पुरस्कार मिळावा, यासाठी नामांकन दाखल केलं आहे. सुंदरराजन यांचे पती एका खासगी विद्यापीठात नेफ्रोलॉजी विभागाचे प्रमुख आहेत. मोदींनी २३ सप्टेंबरला आयुष्यमान भारत योजनेचा शुभारंभ केला. या योजनेचा लाभ देशातील १० कोटींपेक्षा अधिक कुटुंबांना मिळणार आहे. ही जगातील सर्वात मोठी आरोग्य योजना आहे. ही योजना लागू केल्याबद्दल मोदींना शांततेचं नोबेल देण्यात यावं, असं सुंदरराजन यांनी नामांकन अर्जात नमूद केलं आहे.

स्वीडनचे उद्योगपती आणि शास्त्रज्ञ आल्फ्रेड नोबेल यांच्या स्मृतीप्रित्यर्थ नोबेल पुरस्कार दिला जातो. संशोधन, रसायन शास्त्रज्ञ, साहित्य, शांतता या क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा गौरव नोबेल पुरस्कारानं केला जातो. १९०१ मध्ये पहिला नोबेल पुरस्कार देण्यात आला होता. आल्फ्रेड नोबेल यांच्या मृत्यूनंतर ५ वर्षांनी हा पुरस्कार देण्यात आला होता. येत्या १० डिसेंबरला नोबेल पुरस्कार वितरणाचा सोहळा संपन्न होणार आहे.

ही बातमी पण वाचा : विरोधीपक्ष मोदीफोबियाने ग्रस्त : अमित शहा