पंतप्रधान मोदींनी केली मिल्खा सिंह यांच्या प्रकृतीची चौकशी, म्हणालेत …

Maharashtra Today

दिल्ली :- धावपटू पद्मश्री मिल्खा सिंह (Milkha Singh) यांची प्रकृती खालावल्याने त्यांना गुरुवारी पीजीआय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही बातमी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना कळताच त्यांनी मिल्खा सिंह यांना फोन केला आणि तब्येतीची चौकशी केली. लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. घरी परतल्यावर टोकयो ऑलम्पिकमध्ये भाग घेणाऱ्या भारतीय खेळाडुंचे मनोबल वाढवा, अशी विंनती केली.

मिल्खा सिंह यांना १९ मे रोजी करोनाची लागण झाली होती. २४ मे रोजी फोर्टीज रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना ऑक्सिजन सपोर्टवर ठेवले होते. प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना ३० मे रोजी कुटुंबाच्या आग्रहाखातर सुटी देण्यात आली. त्यांच्यावर घरीच उपचार सुरु होते. गुरुवारी त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना पीजीआय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मिल्खा सिंह यांना ताप आणि श्वास घेण्यास त्रास होत होता. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. मिल्खा सिंह यांची पत्नी निर्मल कौर यांची ऑक्सिजन लेव्हल कमी झाल्याने त्यांनाही आयसीयू वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले आहे.

मिल्खा सिंह (९१) यांनी अद्याप कोरोनाची लस घेतली नाही. मिल्खा सिंह यांची प्रकृती खालावल्याने त्यांचा मुलगा जीव मिल्खा सिंह दुबईहून व अमेरिकेत डॉक्टर असलेली मुलगी मोना सिंह ही भारतात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button