पंतप्रधान मोदी पुण्यात ; रोहित पवारांकडून स्वागत, भाजप नेत्यांकडून केली ‘ही’ अपेक्षा

Rohit Pawar & PM Modi

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज पुणे दौ-यावर आहेत. पुणे विमानतळावर त्यांचं  आगमन झालं आहे. थोड्याच वेळात ते मांजरीला (Manjari)  रवाना होणार असून तिथे असलेल्या सीरम इन्स्टिट्यूटला (Serum Institute Pune) भेट देणार आहेत. राष्ट्रवादीचे नेते, आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं  स्वागत केलं आहे. सोबतच पवार यांनी त्यांच्याकडून एक अपेक्षाही व्यक्त केली आहे.

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं महाराष्ट्रात (पुणे) हार्दिक स्वागत! या दौऱ्यात राज्यातील भाजपचे नेते पंतप्रधान मोदींना भेटतील. तेव्हा केंद्र सरकारकडं अडकलेला जीएसटीसह (#GST) इतर सर्व प्रलंबित निधी राज्याला त्वरित देण्याची आजवर कधीही न केलेली राज्याच्या हिताची मागणी ते करतील, ही अपेक्षा!’ असं आमदार रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. दरम्यान, ‘सीरम’मध्ये ते कोरोना लसीचा आढावा घेणार आहेत.

पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये तयार करण्यात येत असलेल्या कोरोना लसीचा  आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शनिवारी पुणे दौऱ्यावर आहेत. दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सीरम इन्स्टिट्यूटला   सकाळपासूनच कडक पोलीस बंदोबस्त पाहायला मिळत आहे. एवढंच नाही तर बॉम्बशोधक व नाशक पथकाने सीरम इन्स्टिट्यूटची पाहणी केली आहे; शिवाय वाहतूक शाखेचे पोलीस सीरम इन्स्टिट्यूटच्या बाहेर तैनात करण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी दुपारी सीरम इन्स्टिट्यूटला भेट देतील आणि लसीबाबत आढावा घेतील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER