पंतप्रधान मोदी यांचे ट्विटरवर जगात सर्वाधिक फॉलोअर्स

PM Narendra Modi

नवी दिल्ली :- पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे आता ट्विटरवर जगातील सर्वाधिक फॉलोअर्स असणारे सक्रिय (पदावरील) राजकीय नेते बनले आहेत. अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांचे ट्विटर अकाऊंट कायमचे बंद झाल्यानंतर आता मोदी हेच ट्विटरवर अव्वल स्थानी आले आहेत. ट्रम्प यांच्या समर्थकांनी कॅपिटॉल हिल बिल्डिंगवर केलेल्या हल्ल्यानंतर ट्विटरने ट्रम्प यांचे अकाऊंट कायमस्वरूपी बंद केले होते.

ट्विटरवर मोदींचे 64.7 दशलक्ष म्हणजेच 6.47 कोटी फॉलोअर्स आहेत. अकाऊंट बंद होण्यापूर्वी ट्रम्प यांच्या अकाऊंटला 88.7 दशलक्ष म्हणजेच 8.87 कोटी युजर्स फॉलो करीत होते. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे ट्विटरवर 12 कोटी 79 लाख फॉलोअर्स आहेत. ते सर्वाधिक फॉलोअर्स असलेले नेते असले तरी सध्या कोणत्याही पदावर नाहीत. त्यामुळे त्यांचा सक्रिय नेत्यांच्या यादीत समावेश होत नाही. अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचे 2.33 कोटी फॉलोअर्स आहेत. याशिवाय भारताचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे सध्या 24.2 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या ट्विटरवरील फॉलोअर्सची संख्या 21.2 दशलक्ष आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER