‘हे’जगाला कळावं म्हणून पंतप्रधान लालबहादूर ‘अँबेसीडर कार’ वापरायचे!

Foreign Minister Lal Bahadur Shastri

गावच्या पुढाऱ्यापासून ते देशाच्या पंतप्रधानापर्यंत ‘अँबेसीडर कार’ त्यांची ओळख होती. लाल दिवा असणाऱ्या अँबेसीडर कारला समाजात वेगळं वलय प्राप्त झालं होतं. हिंदोस्थान मोटर्सनं १९५८ साली पहिल्यांदा ही कार बाजारात आणली. त्यावेळच्या ‘मेक इन इंडीया’चं हे उदाहरण होतं. दिसायला रुबादारण आणि बनावटीत मजबूत असणारी अँबेसीडर कार राजकारण्यांच वाहन म्हणून प्रसिद्ध होती.

लहानमुलं सुद्धा ही गाडी दुरुस्त करु शकतात असं त्यावेळी म्हणलं जायचं. म्हणजे या गाडीची रचना किती सोप्पी आणि सरळ असेल याचा अंदाज येईल. ‘मॉरिस ऑक्सफर्ड’च्या तिसऱ्या मालिकेतल्या मॉडेलवरुन अँबेसीडर बनवण्यात आली. मॉरिस ऑक्सफर्डही ब्रिटनमधील सर्वात दिमाखदार कार होती. मॉरिस ऑक्सफर्डच्या डिझाईन पासून प्रेरणा घेत १४८९ सीसी इंजिन असणारी अँबेसीडर ही पहिली भारतीय डिझेल इंजिनची गाडी होती.

भारतातल्या सात पिढ्यांनी या गाडीला पाहिलंय. पहिल्या मॉडेलच नावं होतं मार्क १, बी.एस. चार प्रमाणांना ग्राह्य धरुन ही कार बनवण्यात आली होती. भारतीय अधिकारी आणि पुढारी दोघांसोबत अंबेसिडरच नातं गहण होतं. या मजबूत गाडीवर जेव्हा लाल दिवा ऐटीत फिरु लागला तेव्हा या कारला अधिक प्रतिष्ठा प्राप्त झाली. प्रधानमंत्री असो की मोठा राजकारणी. अनेक दशकांपर्यंत त्यांचं वाहन म्हणून अंबेसिडनं ओळख टिकवली. अँबेसीडर आणि राजकारणाचा इतका जवळचा संबंध होता की एका वर्तमान पत्रात अँबेसीडरनं जाहीरात करताना म्हणलं होती, “आम्ही अजूनही खऱ्या राजकीय नेत्यांची प्रेरक शक्ती आहोत.”

नेहरु, शास्त्री आणि अँबेसीडर कारचा किस्सा

भारताचे पहिले पतंप्रधान जवाहरलाल नेहरु (PM Jawaharlal Nehru) रोजच्या प्रवासासाठी भारतीय बनवाटीच्या कार वापरत असत; पण जेव्हा ही बाहेरच्या देशातले राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान भारताला भेट द्यायचे. त्यांना आणण्यासाठी कॅडलॅक गाडी वापरत. तत्कालीन परराष्ट्रमंत्री लालबहादूर शास्त्री (Foreign Minister Lal Bahadur Shastri) यामुळं चकित व्हायचे. एकदा शास्त्रींनी नेहरुंना ही गोष्ट विचारली. तेव्हा नेहरु म्हणाले .”भारताचा पंतप्रधानसुद्धा कॅडिलॅक वाहनातून फिरु शकतो हे बाहेरच्या देशातील पंतप्रधान राष्ट्राध्यक्षांना कळावं म्हणून मी कॅडिलॅक कार वापरतो.”

१९६४ साली जेव्हा शास्त्रींकडे भारताच नेतृत्व आलं तेव्हा ते अँबेसीडर कारच वापरायचे. जेव्हाही ते परदेशातील पाहण्यांना आणण्यासाठी याच गाडीचा उपयोग होत असे. ते नेहरुंच्या प्रथेच पालन का करत नाहीत हा प्रश्न विचारल्यावर ते उत्तर द्यायचे. “नेहरु एक महान नेते होते. त्यांच अनुकरण करणं अवघड आहे. विदेशातले नेते काय विचार करतात याचा मला फरक पडत नाही. कारण त्यांच्यापर्यंत हे पोहचणं गरजेच आहे की भारताचा पंतप्रधान भारतात बनलेल्या कारनेच प्रवास करतो.”

१९९० साली जागतिकीकरणानंतर भारतात जगभरातील ऑटोमोबाइल व्यावसायीक आले. अँबेसीडरच्या वर्चस्वाला यामुळं धक्का बसला. अनेक वेगवेगळ्या कंपनीच्या गाड्या बाजारात आल्या. यानंतर हळू हळू अँबेसीडरची लोकप्रियता कमी होत गेली. आज काही मोजकेच अधिकारी किंवा हौसी लोक ही गाडी वापरताना दिसतात. २०१४ साली कंपनीनं अँबेसीडर कारचं उत्पन्न बंद करत असल्याची घोषणा केली. याआधी ‘अम्बी’ या नावानं आजच्या काळातला लुक देऊन कॉम्पेक्ट कार बाजारात आणण्याचा कंपनीने प्रयत्न केला होता पण तो अशस्वी ठरला.

अमूलनं अँबेसीडर बंद केल्यानंतर पोस्टर रिलीज केलं होतं. ते पोस्टर देशवासीयांच्या भावना तंतोतंत व्यक्त करणारं असल्यामुळं त्या पोस्टरची देखील मोठी चर्चा झाली. जितकी प्रतिष्ठा भारतीय रस्त्यांचा राजा मानल्या जाणाऱ्या गाडीला प्राप्त झाली तितकी इतर कोणत्या कारला झाली नाही. भारतीय राजदूत असं ही या कारला म्हणलं जायचं. भारतीय स्वातंत्र्यानंतर भारताच्या नव निर्माणाच प्रतीक म्हणून ही कार अनेकांच्या स्मृतीत कायमची जागा बनवूण आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button