पंतप्रधान मोदींकडून जो बायडन यांचं अभिनंदन, म्हणाले…

PM Modi-Joe Biden

नवी दिल्ली : अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुकीत (US presidential election)डेमॉक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांनी निर्णायक आघाडी घेत विजय मिळवला आहे. ते लवकरच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून पदभार स्विकारणार आहेत. तर जो बायडेन यांच्याबरोबर उपराष्ट्राध्यक्षपदी निवडून आलेल्या कमला हॅरिस यांनी अनेक बाबतीत इतिहास घडवला आहे. अमेरिकेच्या इतिहासात पहिल्या कृष्णवर्णीय, महिला आणि त्यातही भारतीय वंशाच्या महिलेला हा सन्मान मिळाला आहे.

जो बायडन यांच्या विजयाचा जल्लोष करण्यासाठी अमेरिकेतील जनता रस्त्यावर उतरली आहे. टाळ्या, थाळ्या, बिगुल आणि वेगवेगळी वाद्य वाजवून हा जल्लोष साजरा केला जात आहे. काही ठिकाणी डान्स करून तर कुठे वाद्य वाजवून त्यांच्या विजयाचा जल्लोष साजरा केला जात आहे. अमेरिकेत जो बायडन यांचा विजय मोठ्या आनंदान साजरा होत असल्याचे व्हिडीओ समोर आले आहेत.

जो बायडन यांच्या विजयानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ट्विट करत अभिनंदन केले आहे. या विजयाबद्दल पंतप्रधान मोदींनी जो बिडेन आणि कमला हॅरिस यांचे अभिनंदन केलं. अभिनंदन करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, तुम्ही मिळवलेल्या नेत्रदीपक विजयासाठी तुमचे मनपूर्वक अभिनंदन, याआधी तुम्ही उपराष्ट्राध्यक्षपदी काम करत असताना भारत-अमेरिका संबंध दृढ करण्यादृष्टीने तुमची भूमिका निर्णायक आणि मोलाची होती. त्यामुळे आता देखील भारत आणि अमेरिकेच्या संबंधांना आणखी उंचावर नेण्यासाठी एकत्र मिळून काम करु अशी अपेक्षा करतो, असं नरेंद्र मोदींनी सांगितले.

ही बातमी पण वाचा : अमेरिकेत सत्तांतरण : जो बायडन अमेरिकेचे नवे अध्यक्ष तर, कमला हॅरिस उपाध्यक्ष

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER