आयपीएल 2021 साठी तीन खेळाडूंना 14 कोटींच्यावर किंमत

Jhye Richardson - Glenn Maxwell - Chris Morris

आयपीएल 2021 साठी एकीकडे मॉरिस, मॅक्सवेल व रिचर्डसनसारख्या खेळाडूंना 14 कोटींच्यावर रक्कम मिळाली असताना स्टिव्ह स्मिथसारख्या सफल फलंदाजाला मात्र 2.20 कोटीच मिळाले. त्याला दिल्लीने पसंती दिली.

दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) अष्टपैलू क्रिकेटपटू ख्रिस मॉरिस (Chris Morris) याने आपल्या खेळाने नाही तर आपल्यासाठी मिळवलेल्या प्रचंड किमतीने क्रिकेट जगतात इतिहास घडवला आहे. त्याला चक्क 16 कोटी 25 लाखांची किंमत मिळाली असून एवढी गलेलठ्ठ रक्कम मोजून राजस्थान रॉयल्सने त्याला आपल्या तंबूत घेतले आहे. ख्रिस मॉरिसची बेस प्राईस 75 लाख होती. आयपीएल 2021 (IPL 2021) साठी चेन्नईतील गुरुवारी पार पडलेल्या लिलावात हा विक्रम घडला.

ग्लेन मॅक्सवेलसाठी (Glenn Maxwell) रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने (Royal Challengers Bangalore) 14.25 कोटींची विजयी बोली लावली तर अलीकडेच चेन्नईतील दुसरी कसोटी गाजवलेल्या इंग्लंडच्या मोईन अलीला सीएसके 7 कोटी मोजून आपल्याकडे घेतले.

झे रिचर्डसनसाठी (Jhye Richardson) जबरदस्त चुरस दिसुन आली. त्याची बेस प्राईस दीड कोटी असताना त्याच्यासाठी बोली 10 कोटींच्याही वर गेली. दिल्ली कॅपिटल्सही त्याच्यासाठी प्रयत्नात होते पण टाईट बजेटमुळे त्यांनी सव्वा सात कोटीनंतर प्रयत्न सोडून दिले. एक वेळ तो मॅक्सवेललाही मागे टाकून ख्रिस मॉरिसलाही स्पर्धा देईल की काय असे वाटत होते पण शेवटी 14 कोटींवर तो पंजाबच्या तंबूत आला.

मुस्तफीझूर रहमान हा एक कोटीच्या बेस प्राईसवर राजस्थान रॉयल्सकडे आला. न्यूझीलंडच्या अ‌ॅडम मिल्नेसाठी मुंबई इंडियन्सने 3 कोटी 20 लाख मोजले. दाविड मालन हा दीड कोटीच्या बेस प्राईसवर किंग्ज पंजाबच्या संघात आला, याशिवाय मुंबई इंडियन्सने नेथन कोल्टर नाईल व पियुष चावलास पसंती दिली आहे.

बांगलादेशी अष्टपैलू शकिब अल हसन हा केकेआरकडे, शिवम दुबे हा राजस्थान रॉयल्सकडे आला आहे.

राजस्थान रॉयल्सने रिलीज केलेला त्यांचा कर्णधार स्टिव्ह स्मिथ आता दिल्लीकर झाला आहे. त्याच्यासह उमेश यादवलाही दिल्लीने आपल्याकडे घेतले आहे.

खेळाडू — बेस प्राईस —- मिळाले—- संघ
ख्रिस मॉरिस — 75 लाख— 16.25 कोटी– राजस्थान
ग्लेन मॅक्सवेल- 2 कोटी —- 14.25 कोटी– बंगलोर
झे रिचर्डसन — 1.5 कोटी — 14.00 कोटी — पंजाब
अ‌ॅडम मिल्ने — 50 लाख — 3.20 कोटी — मुंबई
डेविड मालन–1.50 कोटी — 1.50 कोटी– पंजाब
शिवम दुबे —- 50 लाख —- 4.40 कोटी — पंजाब
मोईन अली — 2.0 कोटी — 7.00 कोटी— चेन्नई
शकिब अल —-2.0 कोटी — 7.00 कोटी — चेन्नई
स्टिव्ह स्मिथ —2.0 कोटी- – 2.20 कोटी— दिल्ली
मुस्तफिझूर —-1.0 कोटी – 1.0 कोटी — राजस्थान
कोल्टरनाईल — 1.5 कोटी – 5.0 कोटी — मुंबई

अपेक्षेप्रमाणे दोन कोटीची बेस प्राईस लावलेले हरभजन सिंग व केदार जाधव, सॅम बिलिंग्ज हे अनसोल्ड राहिले. अनसोल्ड खेळाडूंमध्ये करुण नायर, अ‌ॅलेक्स हेल्स, जेसन रॉय, एव्हीन लुईस, आरोन फिंच, हनुमा विहारी, ग्लेन फिलिप्स, अ‌ॅलेक्स कॅरी व कुशाल परेरा आहेत.

ही बातमी पण वाचा : आयपीएलसाठी लिलाव आज, 61 जागांसाठी 292 खेळाडू

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER