प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर !

Prevention is better than cure

positive psychology ,सकारात्मक मानसशास्त्राच्या वाटेवर वाटचाल करत असताना…! फ्रेंड्स, तुम्ही म्हणाल ,बाबा आता या पॉझिटिव शब्दाची भीती वाटू लागली आहे. आणि आज काय नवीन सांगणार ? एवढ्या आजूबाजूला गंभीर घटना घडत असताना कसं हो टिकवणार मन:स्वास्थ ? सांगणं सोप आहे !

बरोबर आहे अगदी. पण हे जे चाललंय ते आपल्या सगळ्यांचे भोवती आहे. तुम्ही, मी ,आपण सगळेच यात भरडले जातो आहोत. आणि माणूसच आहे ,तर त्रास होणारच ना ! Getting affected is normal but remaining affected is abnormal . मग यातून कसं बाहेर पडणार ?

अनेक वर्षांपूर्वी पासूनच मानसिक अनारोग्याचा संबंध हा मनोरुग्णालय, रुग्ण, डोक्याची बिमारी असलेले किंवा मनोरुग्णांना दाखल करायची ठिकाणे इतपतच होता. इतकी प्रगती या क्षेत्रात होऊन ही अजून त्याविषयीचा एक स्टीगमा कायम आहे तो आहेच. अजूनही त्या डॉक्टरांकडे जायची लाज वाटतेच .

परंतु 21व्या शतकात मानसिक आजारावर त्या व्यतिरिक्त देखील उपाय करणारे एक नवीन क्षेत्र निर्माण झाले आणि ते म्हणजे पॉझिटिव्ह सायकॉलॉजी ,सकारात्मक मानसशास्त्र ! या मानसशास्त्राच्या शाखेमध्ये, काय चूक आहे ! किंवा कुठे प्रॉब्लेम आहे यापेक्षा काय बरोबर आहे ? आणि कुठलास प्रश्नच उपलब्ध होऊ नये किंवा त्रास निर्माण होऊच नये म्हणून काय करता येईल याचा विचार असतो. आणि आज अशी पॉझिटिव वेलनेस सेंटरस् उभारली जात आहेत . A stich in time saves nine, या म्हणीप्रमाणे वेळेवारी घेतलेली काळजी किंवा precautions काय वाईट आहे ?

मार्टिन सेलिगमन याने ही संकल्पना पुढे आणली .1998 ला ही वापरली. आपली संख्या रेषा असते, त्यात आपण जर झिरोवर उभे असू तर उजवीकडे जाणे,+1,+2 ही सकारात्मक मानसशास्त्रकडे वाटचाल असेल, आणि 0 च्या डावीकडचे पूर्ण क्षेत्र हे मानसिक आजार आणि त्यावरची दुरुस्ती असं समजायला हरकत नाही. मग आधी आजाराला सामोरे जाऊन मग सावकाश सकारात्मक पॉझिटिव्हिटीकडे वाटचाल हा खूप लांबचा रस्ता घेण्यापेक्षा, 0 वर म्हणजेच न्यूट्रलवर असतानाच आपण पॉझिटिव्ह सायकोलॉजीची मदत घ्यायला काय हरकत आहे ?

मुख्य म्हणजे याबाबत अभ्यास करताना, माझा अभिमान द्विगुणित होत होता. इतर सगळे शोध जसे परदेशातून वेगळ्या रूपाने आपल्याकडे आले, आपल्यावर त्या गोरा साहेबांनी एवढी भुरळ घातलेली होती की ते जे सांगत असतील ते आपल्याला पटत होते. अजूनही स्वातंत्र्य मिळून एवढी वर्षे झाल्यानंतरही ” टर्मरिक लाटे “या नावाने आपण कौतुकाने दूध हळद पितो .तोच प्रकार इथेही जाणवला. आपले वेद, उपनिषदे, गीता ,संतांची शिकवण,आपल्या येथील इतर महान व्यक्ती ,स्वामी विवेकानंद, रामकृष्ण परमहंस किंवा अगदी अलीकडील गौर गोपालदास एवढेच नव्हे तर इतर सर्व धर्म पंथांचे ग्रंथ जे सांगतात, तेच आता नव्या रूपामध्ये शुगर कोटेड गोळी होऊन आलेले आहे. त्याला छानसं नाव आहे.” पॉझिटिव्ह सायकोलॉजी ! “ठीक है भाई, अच्छे काम के लिए कोई देर नही होती !

तर असो. मार्टिन सेलिगमन यांनी हे सकारात्मक मानसशास्त्र पाच खांबांवर उभे आहे असे सांगितले आहे.

P — positive Emotions.
E — engagement.
R– relationship
M– meaning.
A– accomplishment.

P # सगळ्यात महत्त्वाचे आपले विचार, जे योग्य, विवेकी असावे हे कित्येक वर्षांपूर्वी श्री रामदास स्वामींनी सांगितले ? किती वर्षांपूर्वी भगवद्गीतेतून कळले ? आपल्या भावना एकदम नाहीच निर्माण होत. त्याही मागे आपला विचारच असतो. आपला सेल्फ टॉक किंवा स्वसंवाद तपासून बघा.”कशाचा अहंकार आलाय देव जाणे?” आज कालच्या मुलांच्या भाषेत,” तिला किंवा त्याला फार एटीट्यूड आहे !” मग तुमच्या या भावना येतात, कुठे राग, कुठे दुःख, तर कुठे द्वेष !

मग या ऐवजी आपण एक” ग्रेटीट्यूट डायरी” लिहिली तर ? सकाळपासून रात्रीपर्यंत मला कृतज्ञता व्यक्त कराव्याशा वाटणाऱ्या माझ्या आयुष्यातील ,दिवसातील तीन गोष्टी दररोज नोंद करा त्यामध्ये ! सुरुवातीला आपल्याला वाटत नाही, अशा काही आपल्याला दिसतील असं ! पण लक्षपूर्वक बघितलं तर नकळत कित्येक जणांबाबत कृतज्ञता व्यक्त करता येते. परत आपल्या संस्कृती वर येतो आपण ! आपली आई ,आजी जेवण झाल्यावर म्हणते किंवा म्हणत असेल ,आठवा.”अन्नदाता सुखी भव, आजच्यासारखे रोज मिळो, अन्नदात्याचे कल्याण होवो.” हा काय आहे बोगस पणा ! याने काय होते ? असही आपल्याला वाटत असेल .

पण नक्की होतं . अन्न देणारा शेतकरी, दुकानदार, त्यासाठी पैसे मिळवून आणणारे आपले बाबा किंवा आई, अन्न बनवणारी आई ,आजी किंवा स्वयंपाकवाल्या मावशी ! एक दिवस म्हणून बघा त्यांना,”मावशी गरम गरम पोळी द्या बरं ! ” मस्त तूप लोणचं पोळी खा .म्हणा , “अरे वाह ! मावशी मस्त गरम पोळी मिळाली तुमच्यामुळे.”अनुभव घ्या .त्या मावशी आणखीन एका पोळीचा आग्रह करतात की नाही ते !

E # ज्या ऍक्टिव्हिटीज किंवा काम, ज्यात तुमची पूर्ण उपजत क्षमता, वैशिष्ट्यपूर्ण स्वतःचे असे गुण जाणीवपूर्वक वापरले जातील अशा कामात स्वतःला गुंतवा. नक्की आपली प्रॉटडक्टिविटी आणि क्षमता, अबिलिटी दोन्ही वाढेलच. आपण म्हणतो, किंवा जॉब चेंज करतोच ना ?” क्यू की काम मे कुछ मजा नही आ रहा था !” आणि “Job satisfaction”हे हवंच .

R # तुम्ही किती यशस्वी होतात, तुमच्या कामांमध्ये किंवा जीवनामध्ये .हे सर्वस्वी आपल्या इंटर पर्सनल नात्यांवर अवलंबून असतं. इतर कुणासाठी तरी काहीतरी चांगलं, प्रेमाने आणि फळाची अपेक्षा न ठेवता, मुख्य म्हणजे जरी तो तुमच्या ड्युटीचा भाग नाही म्हणजे समोरच्याला ते अपेक्षितही नाही ,पूर्ण unexpectedly करून बघा ! बघा तुमच्यासाठी कुठली तरी चांगली गोष्ट घडते की नाही ? परत तेच “कर्मण्येवाधिकारस्ते ना फलेषु कदाचन ! “किती आधी सांगितलं गीतेत !

M # सगळ्यासाठी काहीतरी अर्थपूर्ण करणं किंवा असणं . जेव्हा कशासाठी जगायचं ? जगण्यासाठी काहीतरी अर्थपूर्णता असेल तर किमान विशिष्ट ध्येय असेल तर अस्तित्वाला अर्थ. पण आपण हा विचारही करत नाही. तुम्हालाही विचारलं ,कशासाठी जगताहेत तुम्ही ? माहित नाही, कधीच विचार केला नाही, किमान केला तरी माझा नवरा ,मुलांसाठी जगते. किंवा मी ,माझी बायको, आई वडील, कुटुंबासाठी जगतो… पण मग स्वतःसाठी ? स्वतःच्या आनंदासाठी ? नाही ! तर…. मग …”आनंद देण्यासाठी आणि घेण्यासाठी जगा !”

A # Set tangible goals for yourself ! आणि मग मोठ्या धेय्याबरोबरच छोटी छोटी ध्येय मिळवली तर त्याची स्वतःलाच जाणीव असू द्या. त्याचा आनंद साजरा करा आणि त्याबद्दल स्वतःचा अभिमानही वाटू द्या ! द्या स्वतःच्या पाठीवर थाप किंवा घ्या स्वता:साठी एक कॅडबरी ! ( मुले मोठी झाल्यानंतर आपल्याला आवडते म्हणून आपण कॅडबरी खातच नाही. खरं तर मुलांप्रमाणेच आपल्याला ती आवडत असते. अर्थात नेहमी नेहमी नाही हा ! कारण आपण आहाराच्या संबंधी बोलताना बोलूच या!)

फ्रेंड्स ! आयुष्य रोलर्कॉस्टर सारखे आहे . कभी खुशी ,कभी गम ! हे येतच राहणार आहे .But how you bounce back ? हे सकारात्मक मानसशास्त्र सांगतं . मग उघडा या शाखेची दार . खुल जा सिम सिम ! जावू या आतमध्ये आणि जगू या आनंदे !

मानसी गिरीश फडके
(समुपदेशक व सायकोथेरपिस्ट)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button