बेस्ट कामगारांचा संप मागे घेण्यासाटी प्रशासनाचा दबाव : शशांक राव

best-bus-

मुंबई :- प्रशासन दडपशाही करून संप मागे घेण्यास सांगत आहे मात्र, बेस्ट कामगारांचा संप सुरू ठेवूनच चर्चेला येणार असल्याचा ठाम निर्धार कृती समितीचे शशांक राव यांनी कामगारांच्या मेळाव्यामध्ये सांगितले. बेस्ट कामगारांच्या संपाचा फटका हजारो मुंबईकरांना चार दिवसांपासून सहन करावा लागत असून मुंबई -बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपावर चौथ्या दिवशीही तोडगा निघू शकलेला नाही.

महापालिकेकडून कृती समितीवर दबाव टाकण्यात येत असून आधी संप मागे घ्या, मग तोडगा काढू, असे राव म्हणाले. उद्या राज्य सरकारच्या उच्चस्तरीय समितीची बैठक होणार असल्याने संप मिटल्याची घोषणा करण्यासाठी सरकार- पालिकेने तगादा लावला होता. संपावर तोडगा काढण्यासाठी दुपारी 4 वाजता मुख्य सचिव, वाहतूक विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि नगर विकास खात्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली होती. मात्र, यावेळीही तोडगा निघू शकला नाही.