जिल्हा परिषद सदस्यत्वाचा राजीनामा देण्याचा शिवसेनेकडून दबाव- सौ. लक्ष्मी शिवलकर

ShivSena Flags

रत्नागिरी / प्रतिनिधी : ग्रीन रिफायनरी प्रकल्पाला दिलेल्या समर्थनामुळे सागवेचे शिवसेना विभागप्रमुख राजा काजवे यांच्यावर निलंबनाची कारवाई केल्यानंतर आता आपल्यावरही जिल्हा परिषद सदस्यत्वाचा राजीनामा देण्याचा दबाव पक्षातून टाकला जात असल्याचा आरोप सागवे जिल्हा परिषद सदस्या सौ. लक्ष्मी शिवलकर यानी केला आहे . मात्र आपल्याला जनतेने निवडून दिले असल्याने आपण बिलकूल राजीनामा देणार नसल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले आहे .

पंतप्रधानांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, सीएएला घाबरण्याचे कारण नाही

ग्रीन रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थन भूमिकेवरुन राजापूर शिवसेनेत दुफळी निर्माण झाली असून आता ती वाढत चालली आहे. विभागप्रमुख राजा काजवे यांची उचलबांगडी झाल्यानंतर सागवे विभागातील सर्व शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकर यांच्याकडे सादर केले. दरम्यान तालुकाप्रमुखानी सागवे विभागाची शिवसेनेची कार्यकारणी बरखास्त केली. कारवाई म्हणून राजा काजवेंचा राजीनामा घेण्यात आला आणि सागवेची कार्यकारणीच बरखास्त केली असल्याचे सांगत तुमच्याही जिल्हा परिषद सदस्यत्वाचा राजीनामा द्या असा दबाव प्रकाश कुवळेकर यानी टाकल्याचे शिवलकर यानी स्पष्ट केले आहे .