आज भाजप नेत्यांच्या ठिकठिकाणी पत्रपरिषदा

Devendra Fadnavis - Chandrakant Patil

मुंबई : मराठा आरक्षणाला (Maratha Reservation) स्थगिती मिळाल्यानंतर राज्यातील वातावरण तापले आहे. आरक्षणासाठी मराठा समाज (Maratha Community) आक्रमक झाला असून, आज सोलापूर (Solapur) बंदची हाक दिली आहे. तर दुसरीकडे आघाडी सरकार मराठा आरक्षण टिकवू शकले नाही, असा आरोप भाजपकडून (BJP) केला जात आहे. याच मुद्द्यावरून आज ठिकठिकाणी भाजप नेत्यांच्या पत्रपरिषदा होत आहेत.

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांची कोल्हापूर, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) नागपूर, केशव उपाध्ये मुंबई, अनिल बोंडे अध्यक्ष किसान मोर्चा अमरावती, सुधीर दिवे वर्धा, हरिभाऊ बागडे यांची औरंगाबाद येथे पत्रपरिषद होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER