पत्र परिषद पवार घराण्यावर चर्चा करण्यासाठी नाही : अजित पवार संतापले

पिंपरा-चिंचवड : पार्थ पवार हे लोकसभेला शहरात दिसत होते. आता मात्र विधानसभेला सक्रिय नाहीत असा प्रश्न त्यांना विचारला असता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार संतपाले. ते म्हणाले, ही पत्रकार परिषद पवार घराण्याची चर्चा करण्यासाठी नाही. आम्ही आमच्या घरात काय करायचे ते करू. पक्षाचे अधिकृत उमेदवार, आम्ही केलेले पुरस्कृत उमेदवार, आमचा जाहिरनामा किंवा सत्ताधारी असलेल्या व्यक्तींबद्दल घेतलेली भूमिका याबद्दलची चर्चा करा.

पार्थने विधानसभेत येऊ नये असे मला वाटते, मी त्याचा बाप आहे. आम्ही आमच्या घरात काय करायचे ते आम्ही बघू, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार संतपाच्या भरात म्हणाले. त्यानंतर मात्र पवार स्वत:च हसल्याने कार्यकर्त्यांमध्येही एकच हंशा पिकला. पिंपरी चिंचवडमध्ये येथे पत्ररिषदेत अजित पवार यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांवर टीका केली.

पार्थने लोकसभेलाच यावे आणि विधानसभेला येऊ नये यात गैर काय आहे, असे पत्रकारांनी विचारताच अजित पवार म्हणाले,”पार्थ पवार यांनी विधानसभेला येऊ नये असे मला वाटते. मी त्याचा बाप आहे, असे त्यांनी सांगितले.