महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावा – चिराग पासवान

President rule in Maharashtra - Chirag Paswan demand.jpg

पाटणा : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे कार्टून ‘फॉरवर्ड’ केल्याबद्दल शिवसैनिकांनी मुंबईत नौदलाच्या माजी अधिकाऱ्याला मारहाण केली. याबद्दल सर्वत्र तीव्र टीकेच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. जनशक्ती पक्षाचे प्रमुख आणि खासदार चिराग पासवान (Chirag Paswan) यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती शासन (President rule) लावण्याची मागणी केली आहे.

ही बातमी पण वाचा:- महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा, ‘त्या’ अधिकाऱ्याच्या मुलीची मागणी

पासवान यांनी आरोप केला की, महाराष्ट्रात उत्तर भारतीयांना ‘टार्गेट’ केले जाते आहे. कंगनाने प्रश्न विचारले म्हणून तिचे कार्यालय तोडण्यात आले. उद्धव ठाकरे यांचे व्यंग्यचित्र ‘फॉरवर्ड’ केले म्हणून माजी नौदल अधिकाऱ्याला मारहाण करण्यात आली. असेच वातावरण कायम राहिले तर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. लोकांमध्ये सुरक्षेची भावना नसेल, भीतीचे वातावरण असेल आणि सरकारला लोक घाबरत असतील तर राष्ट्रपती राजवटीशिवाय पर्याय नाही.

माजी नौदल अधिकाऱ्याला मारहाण

माजी नौदल अधिकारी मदन शर्मा (६२) यांना शुक्रवारी (११सप्टेंबर) काही शिवसैनिकांनी मारहाण केली होती. मदन शर्मा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबतचे एक व्यंग्यचित्र व्हॉट्सअॅपवर ‘फॉरवर्ड’ केले होते. या मारहाणीत शर्मा यांच्या डोळ्याला दुखापत झाली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER