कोरोना योद्धा मोहम्मद यांच्या कुटुंबाला राष्ट्रपतींनी दिली दोन लाखांची मदत

President donates Rs 2 lakh to Corona warrior Mohammad's family

नवी दिल्ली : कोरोनाच्या साथीचा काळात रुग्णांना रुग्णालयात नेणारे व मृत रुग्णांवर अंत्यसंस्कार करणारे रुग्णवाहिका चालक मोहम्मद आरिफ यांच्या कुटुंबाला (Mohammad’s family) राष्ट्रपतींनी दोन लाख  रुपये ( Rs 2 lakh) मदत दिली. राष्ट्रपती भवनाच्या अधिकाऱ्यांनी आरिफ यांच्या घरी जाऊन कुटुंबीयांना दोन लाखांचा चेक दिला. मोहम्मद आरिफ यांनी २०० रुग्णांना वेळेवर रुग्णालयात पोहचवून त्यांचे प्राण वाचवले तसेच कोरोनामुळे मृत्यू झालेल्या १०० पेक्षा जास्त रुग्णांवर अंत्यसंस्कार केलेत.

मोहम्मद आरिफ यांनाही कोरोनाची लागण झाली आणि त्यांचे निधन झाले. कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना  ११ ऑक्टोबर रोजी  रुग्णालयात दाखल केले होते. अचानक त्यांची प्रकृती खालावली. त्यांना तातडीने हिंदुराव हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. दुसऱ्या दिवशी मोहम्मद आरिफ यांचे निधन झाले.

उपराष्ट्रपती व्यंकया नायडू यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली होती. मोहम्मद आरिफ २५ वर्षांपासून शहीद भगत सिंह सेवा दलात काम करत होते. ट्रस्टचे संस्थापक जितेंद्र शंटी यांनी सांगितले की, मोहम्मद आरिफ रुग्णवाहिकेवर ड्रायव्हर होते.

कोरोनाच्या रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याचे काम निःशुल्क करत होते. २४ तास उपलब्ध असायचे. त्यांनी या कामासाठी वाहून घेतले होते. कुटुंबीयांना कोरोनाची लागण होऊ नये म्हणून घरी जात नव्हते. आरिफ यांनी २०० पेक्षा जास्त रुग्णांना रुग्णालयात नेले होते व किमान १०० कोरोना रुग्णांवर अंत्यसंस्कार केले. यात अनेक हिंदू होते. आरिफ हे कुटुंबात कमवणारे एकटे होते. त्यांचे कुटुंब ‘वेलकम’ एल ब्लॉक लोहा मंडी परिसरात भाड्याच्या घरात राहते. त्यांच्यापश्चात पत्नी, दोन  मुलं आणि दोन मुली आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER