ठाणे परिवहन सेवेचा 476.12 कोटींचा अर्थसंकल्प सादर

tmt-buses

ठाणे – ठाणे परिवहन सेवेने गुरुवारी 2018-19 चा सुधारीत आणि 2019-20 चा 476 कोटी 12 लाखांचा अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये जुन्याच योजनांचा नव्याने समावेश करण्यात आला असून नवीन कोणतीही योजना पुढे आणलेली नाही. त्यातही यापुढे महापालिकेकडे अनुदान मागण्यापेक्षा विविध स्त्रोतांमधून उत्पन्न वाढीवर भर देण्याचा दावा करणा:या परिवहन प्रशासनाने यंदा तब्बल 298 कोटी 41 लाख 49 हजारांच्या अनुदानासाठी झोळी पसरली आहे. मागील वर्षी 227 कोटींच्या अनुदानाची अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. यंदा त्यात 71 कोटींची वाढीव मागणी केली आहे. त्यात सुखकर प्रवासीची जुनीच हमी देत ठाणोकरांवर मात्र तब्बल 20 टक्के करवाढीची कु:हाड लादण्याचे प्रस्तावित केले आहे. तर 83 कोटी 92 लाखांची तुट या अर्थसंकल्पात दाखविण्यात आली आहे.

ही बातमी पण वाचा : बारामतीत तेल साठे सापडणार? शोध मोहीम सुरू

ठाणे परिवहन व्यवस्थापक संदीप माळवी यांनी गुरुवारी परिवहन समिती प्रभारी सभापती राजेंद्र महाडीक भोर यांना हे अंदाजपत्रक सादर केले. ठाणो परिवहन सेवेचे 2018 -19 चे 253.68 कोटींचे तर 2019-20 चा 476. 12 कोटींचे तयार करण्यात आले आहे. ठाणे परिवहनच्या ताफ्यात असलेल्या 467 बसेसपैकी परिवहन सेवेच्या 277 बसेस दैनंदिन संचलनात 190 बसेस जीसीसी तत्वावर चालविण्यात येत आहेत. परिवहन सेवेच्या 277 बसेसपैकी 2018-19 मध्ये 108 बसेस संचलनास उपलब्ध होत आहेत. उर्वरीत नादुरुस्त बसेसपैकी 120 बसेस दुरुस्त करुन वोल्वोच्या 30 बसेससह 150 बसेस जीसीसी तत्वावर 2019-20 या आर्थिक वर्षात चालविण्यात येणार आहे.

त्यामुळे 467 पैकी 414 बसेस उपलब्ध होणार आहेत. याशिवाय महिलांसाठी शासनाकडून 5क् तेजस्विनी बसेस परिवहन सेवेत दाखल होणार असून अशा एकूण 517 बसेसचा ताफा ठाणोकरांच्या सेवेत दाखल होणार आहे. त्यानुसार उत्पनाचे प्रमुख स्त्रोत असणा:या साध्या प्रवाशी भाड्यापोटी 32 कोटी 94 लाख, जीसीसी अंतर्गत चालविण्यात येणा:या जुन्या 150 बसेसपासून 55 कोटी 73 लाख, तर जेएनएनआरयुएम योजनेमधून दाखल झालेल्या 190 बसेसकडून 56 कोटी 49 लाख आणि नव्याने दाखल होणा:या तेजस्विनी बसेसपोटी 9 कोटी 22 लाखांचे उत्पन्न अपेक्षित धरण्यात आले आहे. तर संभाव्या भाडेवाढीपोटी वार्षिक 163 कोटी 74 लाखांचे उत्पन्न अपेक्षित धरण्यात आले आहे.

ही बातमी पण वाचा : ठाणेकरांवर करांवर 20 टक्के तिकीट दरवाढीची कु:हाड, जुलैपासून दरवाढ होणार

इतर स्त्रोतांमधून मिळणारे उत्पन्न

बसेसवरील जाहीरात भाडय़ापोटी 3 कोटी 42 लाख, विद्यार्थी पासेस पोटी 1 कोटी 23 लाख, निरुपयोगी वाहन वस्तु विक्रीपोटी 2 कोटी 67 लाख, पोलीस खात्याकडून प्रतिपुर्ती पोटी प्रलंबित 4 कोटी 13 लाख तसेच किरकोळ उत्पन्न 2 कोटी 31 लाख असे 13 कोटी 76 लाखांचे उत्पन्न अपेक्षित धरण्यात आले आहे.

दुसरीकडे 2019-20 या आर्थिक वर्षात पेन्शन व उपदान अदायगीपोटी अर्थसंकल्पात 10 कोटी 36 लाख तरतूद करण्यात आली आहे. त्यातील 7 कोटी 32 लाख महुसुली अनुदानातून मागणी करण्यात आली आहे. तर डिङोल खरेदीसाठी 20 कोटींची तरतूद, सीएनजीच्या देणीपोटी 30 कोटी 10 लाख तरतूद करण्यात आली आहे. सरकारी करापोटी 12 कोटी 59 लाखांची तरतूद करण्यात आली असून त्यातील 7 कोटी 68 लाख महसुली अनुदानातून मागणी करण्यात आली आहे, कर्मचा:यांची थकीत देणी ही 40 कोटी 67 लाखांच्या घरात प्रलंबित असून या पैकी 28 कोटी 88 लाख ठामपाकाकडून अनुदान म्हणून अपेक्षित धरण्यात आली आहे. सेवा निवृत्त कर्मचा:यांसाठी 1 कोटी 91 लाख तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे.

या अंदाजपत्रकातील काही ठळक मात्र जुनीच वैशिष्टये

100 वातानुकुलित इलेक्ट्रीक बसेस

ठाणे महापालिका पीपीपीच्या माध्यमातून 100 इलेक्ट्रीक एसी बसेस 10 वर्षे संचलनासाठी घेणार आहे. त्यातून परिवहनला एक बसेसमागे महिनाकाठी 10 हजारांचे उत्पन्न मिळणार आहे. त्यानुसार सध्या केवळ एकच बस दाखल झाली आहे.

तेजस्विनी बसेस

केवळ महिलांसाठी देखील 50 तेजस्विनी बसेस परिवहनच्या ताफ्यात दाखल होणार असून त्यासाठी शासनाकडून 6 कोटींचा निधी पालिकेकडे वर्ग झाला केव्हांच वर्ग झाला आहे. या बसेसवर वाहक देखील महिलाच असणार आहेत.

ई तिकीटींग प्रणाली विकसित करणार

मागील कित्येक वर्षे कागदी घोडे नाचविणा:या परिवहनमार्फत ही सेवा सुरु करण्यात आली आहे. त्यानुसार ही सेवा कळवा आगार, वागळे आगार तसेच आनंद नगर आगारात कार्यान्वित करण्यात आली आहे. *जेष्ठ नागरीकांना आणि विद्याथ्र्यानी बस प्रवासात मिळणार 50 टक्के सवलत

ठाणे परिवहन सेवेने महापालिका हद्दीतील 60 वर्षावरील जेष्ठ नागरीकांसाठी प्रवासात 50 टक्के सुट देण्यात येणार असून त्या संदर्भातील प्रस्तावाला सुध्दा मान्यता मिळाली आहे. त्याशिवाय ठाणो महापालिका हददीतील आणि भिवंडी शहरातून महापालिका हद्दीत शिक्षणासाठी येणा:या शालेय विद्यार्थी व इयत्ता 15 वी र्पयत शिक्षण घेणारे विद्यार्थी, आय.टी.आय. व तंत्र शिक्षण घेणा:या विद्याथ्र्याना परिवहनच्या बसमध्ये 50 टक्के सवलत देण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. त्यानुसार यातून होणारी तुट ही 1 कोटी 50 लाखांची अपेक्षित धरण्यात आली असून विद्याथ्र्याची ही तुट आणि जेष्ठ नागरीकांची तुट महापालिकेकडून अनुदानातून मिळेल असे अपेक्षित धरण्यात आले आहे.

इतर काही महत्वाची वैशिष्टये

1) एलईडी टीव्ही वरील जाहीरात हक्क देणो, 2) परिवहन सेवेच्या जागांवर होर्डीग्जला परवानगी देऊन उत्पन्न वाढविणो, परिवहन सेवेच्या चौक्या जाहीरातीचे अधिकार देऊन विकसित करणो, अत्याधुनिक पध्दतीने निवारे विकसित करणो, परिवहन सेवेच्या जागांमध्ये एटीएम सेंटरची उभारणी करणो, आगारांमध्ये सौर उर्जा प्रकल्प राबविणो, बसेसमध्ये एलईडी स्क्रीन लावून जाहीरातीद्वारे उत्पन्न वाढविणो.

अनुदानापोटी 298 कोटी 41 लाखांची मागणी –

परिवहन प्रशासाने 476 कोटी 12 लाखांचे मुळ अर्थसंकल्प सादर केले असले तरी त्यात 298.41 कोटींचे अनुदान पालिकेकडे मागितले आहे. मागील वर्षी 227 कोटींचे अनुदान मागितले होते. त्यातही यंदा वाढ करण्यात आली आहे. 298.41 कोटींपैकी महसुली आणि भांडवलीसह 205 कोटी 99 लाख, दिव्यांग व इतर संवर्गातील व्यक्तींच्या सवलतीपोटी 8 कोटी 50 लाख तसेच जी सी सी अंतर्गत चालवण्यात येणा:या बसेस संचालन तुटीपोटी आणि कंत्रटी कामगार अदायगीपोटी 83 कोटी 92 लाख असे मिळून 298 कोटी 41 लाखांच्या अनुदानाची मागणी करण्यात आली आहे.

दिव्यांग व्यक्तींना प्रवास भाडय़ात सवलत

महापालिका हद्दीत वास्तव्यास असलेल्या दिव्यांग व्यक्तींना परिवहनच्या बसमध्ये आता मोफत प्रवासाची सवलत उपलब्ध होणार आहे. दिव्यांग व्यक्तींच्या प्रवास खर्चापोटी होणा:या खर्चाची तरतूद महापालिका अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. तर एड्स बाधीत व्यक्तींना देखील बस भाडय़ात सवलत देण्यात येणार असून ठामपाकडून अनुदानापोटी ही रक्कम मिळविण्याचा परिवहनचा प्रयत्न असणार आहे.