कोल्हापुरात मुसळधार अवकाळी पावसाची हजेरी

Presence of torrential unseasonal rains in Kolhapur

कोल्हापूर :- कोल्‍हापूर शहर आणि परिसरात आज रविवारी दुपारी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे सकाळपासून उष्‍म्‍याने हैराण झालेल्‍या शहरवासीयांना दिलासा मिळाला. दोन आठवड्यानंतर पावसाने पुन्हा हजेरी लावली.

गेला आठवडाभर कोल्हापूरचा पारा ४० अंशाच्या आसपास आहे. दिवसभर कडक उन्हाने नागरिक हैराण झाले होते. दिवसभर ढगाळ वातावरण होते. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास थंड वारा सुटल्याने वातावरणात गारवा पसरला. याच वेळी आकाशात ढगांची गर्दी जमू लागली होती. शहराच्या उत्तर बाजूला विजांचा कडकडाट सुरू होता. पावसामुळे वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाल्‍याने उकाड्याने त्रस्‍त झालेल्‍या शहरवासीयांना दिलासा मिळाला. पावसामुळे शहरातील सकल भागात पाणी साचले. काही भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. तर काही भागात तुरळक पाऊस झाला.

ही बातमी पण वाचा : मान्सून वेळेच्या २ दिवस आधीच केरळमध्ये आला! स्कायमेटचा दावा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER