देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत खा. संभाजीराजे यांचा 50वा वाढदिवस साजरा

Sambhaji Chhatrapati - Devendra Fadnavis

कोल्हापूर : खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांनी आपल्या ५० व्या वाढदिवसानिमित्त करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीचे (Ambabai Temple) दर्शन घेतले. समाजाची सेवा करण्यास संधी मिळू दे, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराज यांचे विचार तळागाळातील लोकापर्यंत पोहचवण्यास बळ दे, अशी प्रार्थना त्यांनी यावेळी केली. विरोधी पक्ष नेता माजी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत नवीन राजवाडा येथे खा. संभाजीराजे यांचा उत्साहात वाढदिवस साजरा झाला.

खासदार संभाजीराजे छत्रपती यांचा वाढदिवसानिमित्त मेन राजाराम हायस्कूल येथे दुर्ग परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. पारंपारिक रितीरिवाजाप्रमाणे करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी मंदिरात गेले. खासदार संभाजीराजे यांच्या हस्ते देवीला साडीचोळी वाहण्यात आली. त्यांच्या हस्ते देवीची आरती करण्यात आली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

समाजाची सेवा करण्याची जास्तीत जास्त संधी मिळावी. छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराज यांचे विचार समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी मी कटिबद्ध आहे. ते तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी मला ताकद मिळावी, असे साकडे श्री करवीर निवासिनी अंबाबाईला घातले असल्याचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराज यांच्या प्रमाणे एक टक्का काम करण्याची संधी मिळाली तर माझे जीवन सार्थक झाल्याचे समाधान मला मिळेल, असेही यावेळी छत्रपती संभाजीराजे म्हणाले. खा. संभाजीराजे यांना शुभेच्छा देण्यासाठी अभिनेता नाना पाटेकर, रितेश देशमुख, मकरंद अनासपुरे, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, आ. प्रकाश आवाडे, आ. ऋतुराज पाटील. आ. पी. एन. पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER