पुढच्या राजकारणासाठी राष्ट्रवादी संधी साधण्याच्या तयारीत

Sharad Pawar

मुंबई : 2020 या सरत्या वर्षाने जगभराला वेगळाच अनुभव दाखवून दिला. कोरोनामुळे सर्वच क्षेत्रांना ब्रेक लावला. त्याला राजकारणही अपवाद नव्हते. अनलाॅकची प्रक्रिया सुरू झाल्यावर नेहमीच्या राजकारणाला चेव चढला आहे. लाॅकडाऊनमुळे समाजातील विविध घटकांचे झालेले हाल, रोजगाराचा प्रश्न, कोविड सेंटरमधील कथित भ्रष्टाचार यासोबतच बाॅलीवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण, अभिनेत्री कंगना रनौत विरुद्ध शिवसेना, मेट्रो कारशेड आणि ईडीच्या नोटिसांभोवती यावर्षीचे राजकारण फिरत राहिले.

राज्यात महाविकास आघाडीचा (MVA)नवा राजकीय प्रयोग सुरू झाला आहे. त्या अनुषंगाने मुंबईतील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वाॅर्ड आणि विभागस्तरावरील नेते, कार्यकर्त्यांमध्ये एक प्रकारची संभ्रमावस्था आहे. कारण मुंबई महापालिका निवडणुकीत आघाडी होणार की नाही याबाबत स्पष्टता नाही. आघाड्यांच्या बाबतीत असलेल्या अनिश्चिततेमुळे स्थानिक पातळीवरील नेते सध्या तरी ‘थांबा आणि वाट पाहा’ याच भूमिकेत आहेत. निवडणुका एकत्र लढण्याची भाषा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून (NCP) सुरू असली तरी काँग्रेसने भूमिका जाहीर केलेली नाही. तर, भाजप सध्याचे संख्याबळ राखण्यासाठी मोर्चेबांधणी करत आहे. कृष्णकुंजवर शिष्टमंडळांचा राबता वाढला असला तरी त्याचा निकालात लाभ उठविण्यासाठी संघटनेची जोड देण्याचे आव्हान मनसेसमोर कायम आहे.

राज्यात सत्तेत येताच राष्ट्रवादीने मुंबई महापलिकेच्या निवडणुकीवर वर लक्ष केंद्रित केले आहे. कार्यकर्त्यांचा मेळावा घेत पालिका निवडणुकीचे रणशिंगही फुंकले गेले. पण, लाॅकडाऊनमुळे त्याला ब्रेक लागला. आता सत्तेच्या माध्यमातून प्रभाव वाढविण्याचे प्रयत्न राष्ट्रवादीकडून सुरू झाले आहेत. मंत्र्यांचा जनता दरबार याकामी लाभाचा ठरेल असा कयास आहे. मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी स्थानिक पातळीवर आक्रमकपणे संघटना बांधणीला सुरुवात केली आहे. अजित पवार (Ajit Pawar) आणि सुप्रिया सुळे यांचे पाठीराखे पकड मजबूत करण्याच्या प्रयत्नात आहेत.

ही बातमी पण वाचा : कितीही प्रयत्न करा, सरकार पाडण्यात भाजपला कधीच यश मिळणार नाही: शरद पवार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला MT LIKE OUR PAGE FOOTER